Kangana Ranaut  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut On Movie Mafia : कंगना रनौतने बॉलिवूडच्या २ सुपरस्टारवर केले गंभीर आरोप, म्हणाली - 'माझे अकाऊंट हॅक करून...'

Kangana Ranaut Account Was Hacked : रविवारीही कंगना रनौतने बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सवर निशाणा साधला आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut Target Ranbir - Hrithik : बॉलिवूडची निडर अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच वादग्रस्त विधान करत असते. बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील स्टार्सवर ती नेहमी टीका करत असते. कंगना अनेकदा काही स्टार्सचे नाव न घेता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असते.

दरम्यान, रविवारीही कंगना रनौतने बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सवर निशाणा साधला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक पोस्ट केल्या आहेत आणि एक घोटाळा कसा सुरू आहे ज्यामध्ये लोकांचे अकाउंट हॅक करण्यासाठी तिचे नाव वापरत आहेत असे सांगितले आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही लोकांचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये घोटाळ्याशी संबंधित गोष्टी लिहिल्या आहेत. कंगना रनौतने पुन्हा एकदा हृतिक रोशनसोबतच्या तिच्या कथित अफेअरचा खुलासा केला आहे.

एक व्यक्ती तिचा प्रतिनिधी असल्याचे भासवून आणि तिचे अकाउंट हॅक करून इतरांची फसवणूक करत असल्याचे कोणीतरी तिला सांगितल्यानंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीजवर अनेक पोस्ट शेअर केल्या याविषयी सांगितले आहे. (Latest Entertainment News)

या घोटाळ्याबद्दल लोकांना माहिती देताना कंगना म्हणाली, “आज सकाळी माझ्या लक्षात आले की फिल्म माफिया एक रॅकेट चालवत आहे. माझ्या नावाचा वापर करून अकाउंट हॅक करत आहे.

कंगनाने पुढे एका चित्रपटाचे नाव न घेता त्याची खिल्ली उडवली आणि म्हणाली “माझा या व्यक्तीशी काहीही संबंध नाही आणि असे कोणतेही ऑनलाइन व्यवस्थापक नाहीत, ही टोळी आहे चंगु मंगू… ज्यांच्या चित्रपट सुट्टीच्या दिवशी देखील मणिकर्णिकाच्या पहिल्या दिवशीच्या (18कोटी) कलेक्शनपर्यंत पोहचू शकला नाही. ज्याला या सर्वांनी फ्लॉप घोषित केले. लोक त्यांच्या नादाला लागणार नाहीत.

Kangana Ranaut instagram Story

कंगना रनौतने तिच्या पोस्टमध्ये अनेक दावे केले आहेत. अभिनेत्रीने लिहिले की, मी ज्या सुपरस्टारला डेट केले होते. त्याने माझ्याशी चॅट करण्यासाठी वेगवेगळे नंबर आणि अकाउंट वापरले. त्याने माझे खातेही हॅक केले. मला वाटले की तो घटस्फोट घेत आहे पण नंतर मला कळले की त्याच्या या वागण्याशी काहीही संबंध नाही. यानंतरही कंगनाने खूप काही काही लिहिलं आहे.

कंगनाने पुढे कोणाचेही नाव न घेता लिहिले, माझ्या घरी एक वुमनायझर सुपरस्टार आला, त्याने मला डेट करण्याची विनंती केली, तो मला लपून-छपून भेटत राहिला, जेव्हा मी या वागणुकीवर आक्षेप घेतला. तेव्हा ताईने सांगितले की ट्रायलॉगी मिळविण्यासाठी 'पपा की परी को देत कर रहा हू.' मला ते मान्य नव्हते आणि मी अशा नात्याला नकार दिला. यूजर्सच्या मते, कंगनाची ही पोस्ट रणबीर कपूरकडे इशारा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT