Kangana Ranaut Emergency Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : बॉलिवूडला खडेबोल सुनावत कंगना रणौतकडून 'इमर्जन्सी'चा प्रचार, केव्हा येणार नवा चित्रपट

Emergency Film : अभिनेत्री कंगना रणौत हिने एक इन्स्टा स्टोरी शेअर करत बॉलिवूडला चांगलेच खडेबोल सुनावले असून तिने आगामी चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरूवात केली आहे.

Chetan Bodke

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बरीच चर्चेत आहे. काल कंगना रणौत यांना चंदीगढ एअरपोर्टवर एका CISF महिला कॉन्स्टेबलने कानाखाली दिली. या प्रकरणामुळे चर्चेत असताना, अभिनेत्रीने एक इन्स्टा स्टोरी शेअर करत बॉलिवूडला चांगलेच खडेबोल सुनावले असून तिने आगामी चित्रपटाच्या प्रमोशनलाही सुरूवात केली आहे. अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. सध्या कंगना यांच्या ह्या इन्स्टा पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

कंगना रणौतने नुकतीच एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. यामध्ये त्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपट रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका महिलेवर पोलिस गोळ्या झाडताना दिसत आहे, असा एक पोस्टर तिने शेअर केलेला आहे. कॅप्शन लिहिले की, " माझा आगामी 'इमर्जन्सी' चित्रपट यावरच आधारित आहे. एका ज्येष्ठ महिलेवर काही खलिस्त्यांनी गोळीबार करत मारलं होतं, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे." असं म्हणत तिने आपल्या चित्रपटाचंही प्रमोशन केले आहे. तर त्यासोबतच तिने बॉलिवूड इंडस्ट्रीवरही सडकून टिका केलेली आहे.

Kangana Ranaut Emergency Film

टीका करताना कंगना म्हणते, "ऑल आईज ऑन राफा गँग (All Eyes On Rafah Gang) जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर झालेला दहशतवादी हल्ला साजरा करताय तेव्हा तयार राहा हा हल्ला तुमच्यावर किंवा तुमच्या मुलांवरही होऊ शकतो." असं म्हणत तिने सेलिब्रिटीजवरही टीका केली. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकवेळा बदलली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या टीमने चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली होती. १४ जून २०२४ ला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे.

Kangana Ranaut On Rafah Gang

'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये कंगना रणौतने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिने या चित्रपटात फक्त मुख्य भूमिका साकारली नाही तर तिने या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. यात विरोधी पक्षनेते जेपी नारायणच्या भूमिकेत अनुपम खेर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत मिलिंद सोमण दिसणार आहेत. 'इमर्जन्सी'मध्ये महिमा चौधरी आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

SCROLL FOR NEXT