kangana ranaut news instagram @ kanganaranaut
मनोरंजन बातम्या

कंगना रणौतनं शेअर केले सेटवरचे फोटो, म्हणाली....

कंगना राणौतने इन्स्टाग्राम हॅडलवर तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: जेव्हा एखाद्या चित्रपटाची घोषणा केली जाते, तेव्हा प्रेक्षकांचं लक्ष प्रामुख्याने चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपटातील स्टारकास्ट याकडे लागतं. चित्रपटाच्या निर्मितीसाठी टीम वर्क महत्वाची असते. एका उत्तम चित्रपटामागे रूपेरी पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांसोबतच त्यांना मदत करणाऱ्या क्रू मेंबर्सचेही तितकेच महत्व असते. मात्र हे चेहरे केव्हाही समोर येत नाही. अशातच इमर्जन्सी दिग्दर्शक कंगना रणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री कंगना राणौतने इन्स्टाग्राम हॅडलवर तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सेटवर केलेली मेहनत दाखवण्यात आली आहे. कंगनाने फोटो शेअर करत तिच्या सोबतच्या क्रू मेंबर्सला 'सेट सोल्जर' आणि 'सेट आर्मी' असंही म्हटलं आहे.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी क्रू मेंबर्स प्रचंड मेहनत घेतात. एका चित्रपटामागे अनेकांची मेहनत असते, असे कंगनाचे म्हणणं आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये क्रू मेंबर एक जड मशीन उचलताना दिसत आहे, तर आणखी एका फोटोमध्ये काही जण सीनवर चर्चा करताना दिसत आहेत. कंगना देखील त्यांना मदत करत आहे. कंगना कॅमेऱ्याच्या मागे बसून क्रू मेंबर्स सूचक इशारा देताना दिसते आहे.

'इमर्जन्सी' हा कंगना रणौतच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचा पहिला चित्रपट आहे. कंगनाचा शेवटचा चित्रपट 'धाकड' चे लेखक रितेश शाह यांनी 'इमर्जन्सी' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. कंगना गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटावर काम करत आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटात कंगना ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांची भूमिका श्रेयस तळपदे साकारणार असून, महिमा चौधरी पुपुल जयकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT