Emergency Release Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Upcoming Movie Emergency : कंगना रनौतच्या बहुप्रतीक्षित 'इमरजेंसी' चित्रपटाची रिलीज डेट आऊट

Kangana Ranaut Emergency Release Date : कंगनाच्या दिग्दर्शनात बनलेल्या पहिल्या 'इमरजेंसी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut's Film Emergency Released Date : कंगना रनौतने "इमरजेंसी" च्या फर्स्ट लूकमध्ये तिच्या पॉवरपॅक कामगिरीने देशाला आश्चर्यचकित केले. या चित्रपटामध्ये कंगना रनौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

कंगनाच्या दिग्दर्शनात बनलेल्या पहिल्या 'इमरजेंसी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधानांनी घोषित केलेल्या देशव्यापी आणीबाणीला 48 वर्ष पूर्ण होत आहेत. आणीबाणी घोषित झाल्याचा व्हिडिओ शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट डिक्लेर करण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फर्स्ट लूक समोर चाहत्यांना या चित्रपटविषयी उत्सुकता आहे. प्रभावी भूमिका आणि संवाद यावर नाहीतर कंगनाने व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रोस्थेटिक्स आणि मॅनेरिझमवरही बरेच काम केले आहे.

या चित्रपटाविषयी सांगताना कंगना रनौत म्हणाली की, आणीबाणी हा आपल्या इतिहासातील सर्वात महत्वाचा आणि डार्क काळ आहे. ज्यांच्याविषयी भारतातातील तरुणांना माहित असणे आवश्यक आहे.

ही एक महत्त्वाची कथा आहे, प्रतिभावान अभिनेते, स्वर्गीय सतीश कौशिक जी, अनुपम जी, श्रेयश, महिमा आणि मिलिंद यांच्यासह या सर्जनशील प्रवासाची एकत्र सुरुवात केल्याबद्दल आभारी आहे. भारताच्या इतिहासातील हा उल्लेखनीय भाग मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. जयहिंद !"

मणिकर्णिका फिल्म्स प्रस्तुत इमरजेंसी चित्रपटाचे दिगदर्शन आणि निर्मिती कंगना रनौतने केली आहे. रितेश शाहची यांनी पटकथा लिहिली आहे तर कथा कंगना रनौतची आहे. इमरजेंसीमध्ये कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात दिवंगत सतीश कौशिक, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 24 नोव्हेंबर 2023 रोजी आणीबाणी रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT