Javed Akhtar and Kangana Ranaut Controversy  Saam TV
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar Controversy: जावेद अख्तर आणि कंगना रनौतची न्यायलयीन लढाई, अभिनेत्रीने कोर्टात नोंदवला जबाब

Kangana Ranaut At Court: जावेद अख्तर यांनी कंगना रनौतविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

Pooja Dange

संजय गडदे

Javed Akhtar - Kangana Ranaut Case:

कंगना रनौतने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीत होणाऱ्या छळवणुकीबाबत काही वक्तव्य केली होती. यात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचे नाव घेतले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना रनौतविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.

या खटल्या संदर्भात महानगर दंडाधिकारी 10 वे न्यायालयाने 313 नुसार नोटीस पाठवून तिचा जबाब नोंदवून घेण्यास उपस्थित राहण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना रनौत आज महानगर दंडाधिकारी 10 वे न्यायालयात उपस्थित राहिली होती. यावेळी न्यायाधीशांकडून कंगना रनौतला काही प्रश्न देखील विचारण्यात आले.

जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांचे आरोप प्रत्यारोप गेले अनेक महिने सुरु आहेत. गेल्या महिन्यात कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात कोर्टात अपील केले होते. जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजार राहत नसल्याचा दावा कंगनाने यावेळी केला होता.

जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. तथापि, त्यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला मेडिकल एमेरजन्सी असल्याने न्यायालयात हजर राहता आले नसल्याचे सांगितले.

कंगना रनौतचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी याला विरोध केला. जावेद अख्तर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याची विनंती केली. रिपोर्ट्सनुसार, रिजवान यांनी दावा केला होता की जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजर झाले नाही, त्यामुळे न्यायाच्या हितासाठी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करावे.

कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्यावर छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यावर जावेद अख्तर यांनी कोर्टात आपली बाजू मांडली होती. कंगना आपल्यावर खोटे आरोप करत असून बदनामी करत आहे असं, म्हणत जावेद अख्तर यांनी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात धाव घेतली. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT