Kangana Ranaut New Movie  Saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौत साऊथ चित्रपटांसाठी सज्ज, रजनीकांतच्या 'या' चित्रपटामध्ये साकारणार महत्वाची भूमिका

कंगना रनौत तामिळ चित्रपट 'चंद्रमुखी'च्या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut New Movie: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिचे चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटांमधील सशक्त पात्रांसोबतच, कंगना तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी देखील ओळखली जाते. आता अशी चर्चा सुरू आहे की कंगना रनौत तिच्या नवीन चित्रपटाच्या माध्यमातून साऊथ चित्रपटांकडे वळू शकते. तिचे नाव एका सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. कंगना रनौत तामिळ चित्रपट 'चंद्रमुखी'च्या सिक्वेलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे, अशी बातमी समोर आली आहे.

कंगना रानौतने अलीकडेच 'चंद्रमुखी 2' मध्ये काम करण्याबद्दल सांगितले आहे. 'पुन्हा एकदा दिग्गज वासूजीसोबत तामिळ चित्रपट करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे', असे ती म्हणाली आहे. कांगणे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेर करत हे सांगितले आहे. चंद्रमुखी 2 मध्ये कंगना रनौतसह सहकलाकार म्हणून अभिनेता राघव लॉरेन्स दिसणार आहे. कंगना रानौत या चित्रपटात उत्कृष्ट शास्त्रीय नृत्य करताना दिसणार आहे. (Kangana Ranaut)

'चंद्रमुखी' हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. रजनीकांत आणि ज्योतिका सरवणन हे या चित्रपटाचे मुख्य कलाकार होते. 'चंद्रमुखी 2' मधील कंगना रनौतच्या सहकलाकारांबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कंगना रनौतचे चाहते तिला साऊथ चित्रपटांमध्ये बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. (Movie)

Kangana Ranaut Instagram Story

कंगना रनौतच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर, अभिनेत्री सध्या इमर्जन्सी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इमर्जन्सी या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वत: करत आहे आणि हा चित्रपट लवकरात लवकर प्रेक्षकांसमोर आणण्यासही ती उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT