Kangana Ranaut Instagram
मनोरंजन बातम्या

कतार एअरवेजबाबत कंगना रणौतने केली 'मोठी चूक',! म्हणाली, मूर्ख माणूस...

आपल्या बेधडक स्टाईलमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आज एका विधानामुळे चांगलीच फसली आहे.

Sanika

मुंबई : आपल्या बेधडक स्टाईलमुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आज एका विधानामुळे चांगलीच फसली आहे. एका Spoof व्हिडिओ क्लिपच्या आधारे, तिने कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बेकर यांना मूर्ख माणूस म्हटले. पण नंतर तिने आपली पोस्ट डिलीट केली.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma Statement) यांच्या वक्तव्यावर मुस्लिम देश भारतावर (India) नाराज आहे. कतारने (Qatar) भारतीय राजदूताला बोलावून याप्रकरणी स्पष्टीकरण देखील मागितले आहे. त्यानंतर भारतातही कतार एअरवेजवर (Qatar-Airways) बहिष्कार टाकण्याचे अपील करण्यात आले होते. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) देखील या मोहिमेत सामील झाली. परंतु तिने सोशल मीडियावर (SOcial Media) एक मोठी चूक केली, जिथे तिने एक Spoof व्हिडिओ खरा असल्याचे मानून बसली. तिने यात कतार एअरवेजच्या सीईओला मूर्ख माणूस म्हटले आहे.

वासुदेवन शेअर केला होता तो व्हिडीओ-

प्रथम वासुदेव नावाच्या ट्विटर यूजरने सर्वप्रथम एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी कतार एअरवेजवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन (Appeal) केले होते. वासुदेव म्हणाले की, हा तोच कतार आहे, ज्याने चित्रकार एमएफ हुसेनला आश्रय दिला होता. एमएफ हुसैन यांनी माता सीता आणि दुर्गा यांचे नग्न छायाचित्र बनवले होते. आज तोच कतार भारताला ज्ञान देत आहे. कतार तेथे राहणाऱ्या भारतीयांवर गोळीबार करत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, मी तुम्हाला कतारी वस्तूंवर विशेषत: कतार एअरवेजवर बहिष्कार घालण्यास सांगू इच्छितो.

त्या व्यक्तीने मुलाखत शेअर केली;

यानंतर एका व्यक्तीने कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये ते एक मुलाखत देत आहे. युजरने लिहिले की कतार एअरवेजच्या सीईओने #BycottQatarAirways साठी वासुदेवच्या कॉलनंतर मुलाखत दिली आहे. मात्र आता हा व्हिडीओ खोटा होता. पण तरी कंगनाने तो खरा असल्याचे समजत आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत अकबर अल बकरला चांगलेच फटकारले.

Kangana Ranaut Deleted Instagram Story

स्टोरीमध्ये काय लिहिले होते?

कंगनाने लिहिले होते की, भारतीय या गरीब माणसाची खिल्ली उडवणारा व्हिडीओ पसंत करत आहेत. ते लोक हे लक्षात ठेवा की, या लोकसंख्येच्या देशावर तुम्हा सर्वांचाच मोठा बोजा आहे, वासुदेव हा गरीब आहे, त्यालादेखील त्याचे विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे. यानंतर तिने कतार एयरवेज चे सीईओ यांना इडियट (मूर्ख) म्हंटले. परंतु तिने नंतर आपली इन्स्टा स्टोरी डिलीट केली.

कंगनाकडून नुपूर शर्मा यांचा बचाव?;

दुसरीकडे, कंगना रणौतने नुपूर शर्माचा बचाव केला. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, नुपूरला तिचे म्हणणे सर्वांसमोर ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण यासाठी तिला धमकावले जात आहे. सर्वांनी नूपुरला लक्ष्य बनवले आहे. जेव्हा हिंदू देवतांचा अपमान होतो तेव्हा आपण न्यायासाठी कोर्टात जातो आणि तो सर्वांसाठी असायला हवा. कोणीही स्वतःला डॉन समजण्याचा प्रयत्न करू नका. हा भारत आहे, अफगाणिस्तान नाही. येथे सर्व काही प्रॉपर सिस्टिमद्वारे होते. येथे एक चांगले सरकार आहे, जे लोकशाही प्रक्रियेअंतर्गत तयार झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

Grah Gochar: डिसेंबर महिन्यात ७ ग्रह करणार गोचर; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT