Kangana Ranaut Reaction On Selfie Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'अक्षय माझी पुरुष आवृत्ती झालाय...', कंगनाने अक्षय आणि करणला चांगलंच सुनावलं

अलीकडेच, करणचा 'सेल्फी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावर कंगनाने केलेल्या टिकेवर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut Reaction On Selfie Movie: बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना राणौतने पुन्हा एकदा करण जोहरवर टिका केली आहे. अलीकडेच, करणचा 'सेल्फी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यावर कंगनाने केलेल्या टिकेवर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, करणच्या 'सेल्फी'ने पहिल्याच दिवशी केवळ 10 लाखांचा गल्ला जमवला असून या चित्रपटाबद्दल कोणीही बोलत नाही. ज्या पद्धतीने करण मला त्रास देतो त्या प्रकारे त्याच्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलेला नाही.

कंगना रणौतने दुसरी पोस्ट शेअर करत एक न्यूज क्लिप शेअर केली आहे. त्यात कंगना म्हणते,"अक्षय कुमार कंगना राणौतची पुरुष आवृत्ती आहे? मी 'सेल्फी' चित्रपट फ्लॉप झाल्याची बातमी शोधत होते, तेव्हा मला आढळले की सर्व बातम्या माझ्याबद्दल (कंगना) आहेत. फिल्म फ्लॉप होण्यामागे माझाही दोष आहे. अनेकांनी मला दोष देत 'सेल्फी' हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झाला, असे म्हणाले आहे. तर अक्षयने या चर्चेत करण जोहरच्या नावाचा वापर न करत प्रेक्षकांना फसवले आहे. लोक माझ्याबद्दल चुकीची अफवा पसरवतात.

Kangana Instagram Status

मात्र, सेल्फी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका दिवसात बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी, नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ 28 लाखांची कमाई केली. आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर किती काळ टिकतो हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT