Kamal Haasan And Maniratnam Thug Life Movie Teaser Out Instagram
मनोरंजन बातम्या

Thug Life Teaser Out: कमल हासन आणि मनिरत्नम ३६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र; ‘Thug Life’चा ॲक्शन पॅक्ड टीझर रिलीज

Chetan Bodke

Kamal Haasan And Maniratnam New Action Movie

टॉलिवूड अभिनेता आणि सुपरस्टार कमल हासन यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना चांगलंच मोठं बर्थडे गिफ्ट मिळालं आहे. कमल हासन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘ठग लाईफ’ (Thug Life)चा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

‘नायकन’नंतर ‘ठग लाईफ’या चित्रपटातून कमल हासन आणि मणिरत्नम (Mani Ratnam) पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ३६ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार असल्यामुळे चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच पोस्टर प्रदर्शित झाला आहे. कमल हासन आणि मनिरत्नम यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘ठग लाईफ’ असं आहे. ‘ठग लाईफ’च्या आधी ही जोडी ‘नायकन’ मध्ये एकत्र दिसले होते. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, कमल यांनी स्वत:चा चेहरा पांघरूणाने झाकून घेतला आहे. तर सोबतच पोस्टरमध्ये आणखी पाच लोकंही दिसत आहेत. त्यांचेही चेहरे पांघरूणाने झाकलेले दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाची कथा फारशी स्पष्ट कळत नाही. (Movies)

तर टीझरही सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये, कमल हासन उभे दिसत आहेत. हातावर पट्टी, लांबलचक केस आणि करडी नजर असा लूक दिसत आहे. त्यासोबतच इतर पाच जणंही दिसत आहेत. (Social Media)

चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत कमल हासन यांच्यासोबत जयम रवी, तृषा, दुलकर सलमान, अभिरामी आणि नासिर दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मनिरत्नम यांनी केले असून राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मद्रास टॉकिजने या बहुप्रतिक्षित चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Tollywood)

कमल हासन आणि मनिरत्नम मुख्य भुमिकेत असलेल्या चित्रपटाचे नाव पुर्वी ‘KH 234’ असे होते. पण त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव ‘ठग लाईफ’ केले. चित्रपटामध्ये गँगस्टार ॲक्शन पॅक्ड ड्रामा पाहायला मिळणार असून हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT