Kamal Haasan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kamal Haasan: 'तुम्ही इतिहासकार आहात की भाषाशास्त्रज्ञ'? कमल हासन यांना उच्च न्यायालयाने फटकारले

Kamal Haasan: तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'ठग लाइफ' संदर्भातील वादात अडकले आहेत. चित्रपटाच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या विधानामुळे कर्नाटकात संताप उसळला.

Shruti Vilas Kadam

Kamal Haasan : तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'ठग लाइफ' संदर्भातील वादात अडकले आहेत. चित्रपटाच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या विधानामुळे कर्नाटकात संताप उसळला असून, कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) ने चित्रपटावर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर, कमल हासन यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर सुनावणी करताना, कर्नाटक उच्च न्यायालयाने कमल हासन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. न्यायालयाने त्यांच्या विधानामुळे कर्नाटकात असंतोष आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाल्याचे नमूद केले. न्यायालयाने विचारले की, "तुम्ही इतिहासकार आहात की भाषाशास्त्रज्ञ आहात? असे बोलून फटकारले " न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, समाजात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारची विधाने टाळावी आणि त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी पार पाडावी.

KFCC ने स्पष्ट केले आहे की, कमल हासन यांनी सार्वजनिक माफी न मागेपर्यंत 'ठग लाइफ' चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. कमल हासन यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात माफीचा उल्लेख नसल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने सांगितले की, "तुम्ही कमल हासन असो किंवा कोणीही, जनतेच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही."

'ठग लाइफ' हा मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपट आहे, ज्यात कमल हासन, सिम्बू आणि त्रिशा कृष्णन प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट 5 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या वादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे वाद अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणामुळे भाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात

Success Story: CA झाला, अमेरिकेतील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी धुडकावली, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS केशव गोयल यांचा प्रवास

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

Friday Horoscope : जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल, प्रगती घडेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

SCROLL FOR NEXT