Kurtas For Men: लग्न किंवा कार्यक्रमासाठी पुरुषांनी शर्ट पॅन्ट ऐवजी ट्राय करा 'हे' कुर्ते आणि लूकमध्ये येईल स्टायलिश बदल

Shruti Kadam

क्लासिक स्ट्रेट कट कुर्ता

पारंपरिक आणि सहज परिधान करता येणारा हा कुर्ता ऑफिस, फॅमिली फंक्शन किंवा कोणत्याही साध्या प्रसंगासाठी योग्य असतो. तो पायजमा, धोती किंवा जिन्ससोबत घालता येतो.

Kurtas For Men | Saam Tv

पठाणी कुर्ता

पठाणी डिझाइनचा कुर्ता हा थोडासा ढगळ आणि मर्दानी लूक देणारा असतो. खास करून ईद, लग्न किंवा पारंपरिक उत्सवांसाठी उत्तम पर्याय.

Kurtas For Men | Saam Tv

शॉर्ट कुर्ता

हा कुर्ता कंबरेपर्यंत लांबीचा असतो आणि कॅज्युअल वेस्टर्न लूकसाठी उत्तम पर्याय आहे. तो तुम्ही जिन्स किंवा चिनो पँटसोबत सहज घालू शकता.

Kurtas For Men | Saam Tv

असिमेट्रिक कुर्ता

पारंपरिक डिझाइनला मॉडर्न टच देणारा हा स्टाइलिश कुर्ता पार्टी किंवा सोज्वळ समारंभासाठी आकर्षक ठरतो. त्याच्या हेमलाइनमुळे त्याला युनिक लुक मिळतो.

Kurtas For Men | Saam Tv

अच्कन स्टाइल कुर्ता

लग्न किंवा भव्य कार्यक्रमांसाठी खास अच्कन स्टाइलचा कुर्ता उत्तम असतो. तो नेहरू जॅकेट किंवा शेरवानी स्टाइलमध्ये देखील घालता येतो.

Kurtas For Men | Saam Tv

इंडो-वेस्टर्न कुर्ता

पारंपरिक भारतीय स्टाइल आणि वेस्टर्न फिनिशचा संगम असलेला हा कुर्ता स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतो. पार्टी किंवा रिसेप्शनसाठी परफेक्ट पर्याय.

Kurtas For Men | Saam Tv

काठीयावाडी किंवा गुजराती कुर्ता

पारंपरिक गुजरात किंवा राजस्थानातील लूक देणारा कुर्ता, बहुतेक वेळा रंगीबेरंगी किंवा कशीदाकामयुक्त असतो. तो विशेषतः नवरात्री किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य ठरतो.

Kurtas For Men | Saam Tv

Comfortable Co-ord Set: ट्रेंडी स्टाइलिश हे 7 प्रकारचे को-ऑर्ड सेट्स आहेत तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

Comfortable Co-ord Set | Saam Tv
येथे क्लिक करा