Kalki 2898 Ad Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kalki 2898 AD Trailer : 'डरो मत, एक नया युग आ रहा है'; 'कल्की २८९८ एडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Kalki 2898 AD Trailer Out : बहुप्रतिक्षित 'कल्की २८९८ एडी' या साय-फाय आणि पीरियोडिक ड्रामा असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झालेला आहे.

Chetan Bodke

बहुप्रतिक्षित 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD)चा ट्रेलर अखेर रिलीज झालेला आहे. 'कल्की २८९८ एडी' या साय-फाय आणि पीरियोडिक ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बिग बी बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन, नाग आश्विन, दिशा पाटनी सह अनेक ताकदीचे कलाकार आहेत. अवघ्या काही तासांपूर्वीच हा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला असून चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, सुरूवातीला काशी शहर दिसत आहे, त्या शहराला चित्रपटामध्ये जगातील पहिले शहर म्हणून ओळख आहे. उत्तम कथानक, दमदार व्हिएफएक्स असलेल्या ह्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ६००० वर्षांपूर्वी असलेल्या ह्या कथानकामध्ये भविष्यकालीन जगाचे चित्र दाखवण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये नव्या युगाची नांदी पाहायला मिळत आहे, ही नांदी काही तरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचे दिसत आहे.

ट्रेलरमध्ये, अनेक कलाकारांचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. ८१ वर्षीय बिग बींनीही चित्रपटामध्ये हटके ॲक्शन सीन्स दिलेले आहेत. लवकरच आई होणाऱ्या दीपिकानेही चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनय केला असून तिच्या अभिनयाची जोरदार चर्चा होत आहे. धडाकेबाज ॲक्शन सीन्स, अफलातून स्क्रिन प्ले आणि हटके कथानक असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. येत्या २७ जून २०२४ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नाग अश्विनने सांभाळली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ६०० कोटींमध्ये, करण्यात आलेली असून या चित्रपटामध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.या चित्रपटाची उत्सुकता फक्त भारतातच नाही तर, जगभरामध्ये कायम आहे. लवकरच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जगभरामध्ये सुरूवात होणार आहे.

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Astrology Alert: मंदिरात चेंगराचेंगरी, रेल्वेची भयानक दुर्घटना; पुढील ५ महिने धोक्याचे, ज्योतिषाची चेतावणी

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT