Kalki 2898 AD Instagram
मनोरंजन बातम्या

Kalki 2 Casting: 'कल्की २८९८ एडी'च्या नावाने फेक कास्टिंग; वैयक्तिक माहिती, पैसे देऊ नका, निर्मात्यांनी केलं सावध

Kalki 2 Casting: ‘कल्की २८९८ एडी’च्या नावाने बनावट कास्टिंग कॉल्स होत असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. वैजयंती मूव्हीजने वैयक्तिक माहिती देऊ नका आणि पैसे देऊ नका, असे आवाहन केले.

Shruti Vilas Kadam

Kalki 2 Casting: दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या ‘कल्की २८९८ एडी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या नावाचा गैरवापर करून बनावट कास्टिंग कॉल्स केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वैजयंती मूव्हीजने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसह कलाकार आणि ऑडिशन देऊ इच्छिणाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

‘कल्की २८९८ एडी’च्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न

वैजयंती मूव्हीजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर महत्त्वाची सूचना जारी केली आहे. काही व्यक्ती किंवा एजन्सी चित्रपटाच्या नावाने बनावट कास्टिंग कॉल्स करत असून, आपण वैजयंती मूव्हीजचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करत असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. त्यामुळे अशा कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही एजन्सीला दिलेली नाही परवानगी

प्रोडक्शन हाऊसने स्पष्ट केले आहे की, आमचा कोणत्याही थर्ड-पार्टी एजन्सी, कंपनी, व्यक्ती किंवा कास्टिंग प्रतिनिधीशी संबंध नाही. तसेच आमच्या वतीने ऑडिशन किंवा कलाकारांची निवड करण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आलेले नाही. त्यामुळे कास्टिंगच्या नावाखाली संपर्क साधणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा.

वैयक्तिक माहिती किंवा पैसे देऊ नका

बनावट कास्टिंगच्या माध्यमातून लोकांकडून वैयक्तिक माहिती किंवा पैसे उकळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑडिशनच्या नावाखाली कोणालाही वैयक्तिक माहिती, कागदपत्रे किंवा इतर तपशील शेअर करू नका, तसेच कोणतेही पैसे देऊ नका, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर ‘कल्की’ची मोहोर

दरम्यान, ‘कल्की २८९८ एडी’ने ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दोन पुरस्कार पटकावले आहेत. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट (संपूर्ण मनोरंजनासाठी)’ आणि ‘सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर’ या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाला. ‘कल्की २८९८ एडी’च्या सिक्वेलचीही चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. दिग्दर्शक नाग अश्विन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टीमने आतापर्यंत साधारण दहा दिवसांचे चित्रीकरण केले आहे. तर, लवकरच चित्रपटाचा अन्य भाग शूट करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी चित्रपटात दीपिका पदुकोण दिसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Lassi Recipe : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

Maharashtra News Live Update: रूक्मिणी मातेस पारंपारिक वनदेवी मातेचा पोषाख परिधान

आता सुटे मसाले विकता येणार नाहीत? तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं!

Pune : मोठी बातमी! रॅपिडो बाइक - टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश; वाचा सविस्तर

DoT Telecom Rules: मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंग कॉलबाबत नवा नियम; १ नोव्हेंबरपासून काय बदलणार, जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT