Bigg Boss 20 House: 'बिग बॉस २०'च्या घरात भन्नाट ट्विस्ट; Room 20 आणि 2X मध्ये दडलंय मोठं सीक्रेट

Shruti Vilas Kadam

वर्षा जैन यांनी केलं घराचं डिझाइन

यंदाच्या ‘बिग बॉस २०’च्या घराची रचना वर्षा जैन यांनी केली आहे. गेल्या १९ वर्षांपासून घराची रचना करणाऱ्या उमंग कुमार यांनी यावेळी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. १० हजार चौरस फुटांच्या घरात तब्बल १०४ कॅमेरे आहेत.

Bigg Boss 20 House

गार्डन एरियात शार्क पूल

घराच्या गार्डन एरियामध्ये शार्कच्या थीमवर आधारित स्विमिंग पूल तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय फुलाच्या आकाराचा नळ, गोरिलाची आकृती आणि झाडाभोवती गुंडाळलेला सापही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Bigg Boss 20 House

रिंगमास्टरच्या पुतळ्यातून प्रवेश

गार्डनमध्ये रिंगमास्टरचा मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये जाण्यासाठी या पुतळ्याच्या पायांमधून जावं लागणार आहे.

Bigg Boss 20 House

ऑक्टोपसच्या आकाराचा लिव्हिंग रूम

यंदाचा लिव्हिंग रूमही वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. हा भाग ऑक्टोपसच्या आकारात तयार करण्यात आला असून, इथे स्पर्धकांमध्ये मैत्रीबरोबरच वादही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Bigg Boss 20 House

किचन बनलं ‘BB Food Truck’

‘बिग बॉस २०’च्या किचनला यंदा पूर्णपणे नवीन लूक देण्यात आला आहे. हे किचन ‘BB Food Truck’च्या थीमवर तयार करण्यात आलं असून, टनल एरियालाही आकर्षक रूप देण्यात आलं आहे.

Bigg Boss 20 House

Room 20 मध्ये दडलंय रहस्य

यंदा पहिल्यांदाच ‘Room 20’ तयार करण्यात आलं आहे. गेल्या सीझनमधील असेंबली रूमच्या जागी हा रूम आहे. मात्र, त्याच्या आत नेमकं काय आहे, हे काही आठवड्यांनंतर समोर येणार आहे.

Bigg Boss 20 House

Room 2X मध्ये दोन गुप्त दरवाजे

Room 2X मध्ये दोन दरवाजे आहेत—एक सामान्य आणि दुसरा छोटा. या दरवाजांमागे काय आहे, हे ग्रँड प्रीमियरमध्ये उघड होणार आहे. रिपोर्टनुसार, या रूमचा लाइफलाईनशी संबंध असून, स्पर्धकांना प्रेशर पॉडमध्ये ठेवून सत्य किंवा कबुली देण्याचं आव्हान दिलं जाऊ शकतं. यशस्वी ठरलेल्या स्पर्धकाला अतिरिक्त लाइफलाईन मिळू शकते.

Bigg Boss 20 House

Moong Dal Dosa Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मूग डाळ डोसा; वाचा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी

Moong Dal Dosa Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा