Shruti Vilas Kadam
एक कप मूग डाळ स्वच्छ धुऊन ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ चांगली भिजल्यावर पाणी काढून घ्या.
भिजलेली मूग डाळ मिक्सरमध्ये घ्या. त्यात थोडे पाणी, हिरवी मिरची, आलं आणि जिरे घालून बारीक वाटून घ्या.
तयार बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घाला. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा किंवा थोडी लाल तिखट पावडरही घालू शकता.
नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करा. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावर थोडे तेल पसरवा.
एक डाव बॅटर तव्यावर घालून चमच्याच्या मदतीने गोलाकार पातळ पसरवा. डोसा पातळ केल्यास तो अधिक कुरकुरीत होईल.
डोसाच्या कडांना थोडे तेल सोडा आणि तळाचा भाग सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर डोसा पलटून दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्या.
तयार मूग डाळ डोसा गरमागरम सर्व्ह करा. नारळाची चटणी, हिरवी चटणी किंवा सांबारसोबत त्याची चव आणखी वाढते.