Kajol is now all set to make an entry in OTT Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री काजोल 'OTT' प्लॅटफॉर्मवर झळकणार, 'The Good Wife' वेबसीरिजमधून लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

काजोलची 'द गुड वाईफ' ही वेबसीरीज लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या अनेक चित्रपट आणि वेबसीरीजच्या घोषणेची रिघ लागली आहे. एका पेक्षा एक दर्जेदार आशय असलेले चित्रपट आणि वेबसीरीज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक दिग्गज कलाकार आता ओटीटीत (OTT) पदार्पण करीत आहेत. आता काजोल ही ओटीटीला अपवाद नसणार. काजोलने (Kajol Devgan) आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत आपले स्थान पक्के केले आहेत. काजोल ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. काजोलची लवकरच 'द गुड वाईफ' (The Good Wife) ही वेबसीरीज 'डिज्नी प्लस हॉटस्टार' वर प्रदर्शित होणार आहे.

'द गुड वाइफ - प्यार, कानून, धोका' या वेबसीरीजमध्ये काजोल मुख्य भूमिकेत असून ही वेबसीरीज 'द गुड वाइफ' या अमेरिकन वेबसीरीजचे भारतीय रुपांतर आहे. काजोलने जुलै महिन्यात एक व्हिडीओ शेअर करत या वेबसीरीजची घोषणा केली होती.

काजोलने 'द गुड वाइफ' वेबसीरीजची घोषणा केल्यापासून ही वेबसीरीज चर्चेत आहे. तसेच प्रेक्षकंही काजोलच्या या आगामी वेबसीरीजच्या प्रतीक्षेत आहेत. आता निर्मात्यांनी या वेबसीरीजचा टीझर शेअर करत काजोलच्या फर्स्‍ट लूकची घोषणा केली आहे. २००९ मध्ये या वेबसीरीजच्या शूटिंगला सुरुवात झाली असून २०१६ मध्ये शूटिंग पूर्ण झाले आहे.

'द गुड वाइफ' या वेबसीरीजमध्ये काजोलचा एक सामान्य गृहिणी ते वकील होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. काजोलचा संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. टीझरमुळे काजोलच्या चाहत्यांच्या उत्सुकतेत अजून भर पडली आहे. 'द गुड वाइफ' ही अमेरिकन वेबसीरीज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून या वेबसीरीजमध्ये अभिनेत्री जुलियाना मागुलीसने मुख्य भूमिका साकारली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT