Kailash Kher
Kailash Kher Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kailash Kher Attacked : गायक कैलाश खेरवर लाईव्ह शोमध्ये हल्ला; क्षुल्लक कारणावरुन प्रेक्षकाची सटकली

Chetan Bodke

Hampi News: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेर नेहमीच आपल्या दमदार आवाजासाठी ओळखला जातो. त्याच्या आवाजाची जादू देशभरातील प्रेक्षकांच्या मनात नेहमी आहे. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीझोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली आहे. बाटली फेकणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ उपस्थित पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतू अद्याप कैलाश खेर यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कर्नाटकातील हम्पी शहरात कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी जमली होती, त्या दरम्यान एका व्यक्तीने कैलाश यांच्याकडे बाटली फिरकवली. कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हम्पीतील या कार्यक्रमाची माहिती शेअर केली होती. रविवारी कैलाश खेर यांनी ट्विट करत सांगितले होते की, 'भारतातील प्राचीन शहर, कालखंड, मंदिरं हम्पीच्या रूपात समाविष्ट केले जात आहे. कैलास खेरचा शिवनाद आज हंपी महोत्सवात गुंजणार आहे.'

हंपीमध्ये सुरू असलेल्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर गायक कैलाश खेर यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कैलाश आणि त्याचा बँड कैलाश या मैफिलीत सहभागी झाले होते. मात्र, या हल्ल्यामागच्या कारणाबाबत बोलताना, कॉन्सर्टदरम्यान एका व्यक्तीने गायकाकडे कन्नड गाणे गाण्याची वारंवार मागणी केल्याचे कळते. मात्र त्याची विनंती कैलासपर्यंत न पोहोचल्याने त्याने त्याच्यावर बाटलीने हल्ला केला. पोलिसांच्या चौकशीतही हल्लेखोराने असेच वक्तव्य केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाची झडप; कार अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

MP Pritam Munde: भाजप संविधान बदलणार? भरसभेत खासदार प्रीतम मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Today's Marathi News Live : नवी मुंबईत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Sangli Loksabha News: वंचितचा पक्ष वंचितांसाठी आहे की धनदांडग्यांसाठी? प्रकाश शेंडगेंचा सवाल; विशाल पाटलांच्या पाठिंब्यावरुन टीकास्त्र

Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

SCROLL FOR NEXT