Mehmood Junior passes away Saamtv
मनोरंजन बातम्या

Mehmood Junior passes away: सिनेसृष्टीवर शोककळा! अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन; शेवटची इच्छा व्यक्त करत घेतला अखेरचा श्वास

Gangappa Pujari

Mehmood Junior passes away:

हिंदी सिने जगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मेहमुद यांना कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास....

हिंदी सिने सृष्टीतील जेष्ठ अभिनेते ज्युनियर महमूद (Mehmood Junior) यांचं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांची ही झुंज अपयशी ठरली. गुरूवारी (७, डिसेंबर) राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनियर महमूद यांनी कारवां, हाथी मेरे साथी, मेरा नाम जोकर, या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली.

अखेरची इच्छा व्यक्त करत घेतला जगाचा निरोप..

ज्युनिअर मेहमूद यांच्यावर टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे जुने मित्र, ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर सचिन आणि अभिनेते जितेंद्र यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्युनिअर मेहमूद यांची सिने कारकिर्द...

ज्युनियर मेहमूदने यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. 1967 मध्ये संजीव कुमार यांच्या नौनिहाल या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी ते केवळ 11 वर्षांचे होते. यानंतर संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, दादागिरीसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयांची जादू पाहायला मिळाली. मेहमूद यांनी अभिनेते राजेश खन्ना आणि गोविंदा यांच्या चित्रपटांमध्ये जास्त काम केले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT