Jubin Nautiyal, Payal Dev Twitter
मनोरंजन बातम्या

Pyar Hona Na Tha New Song: जुबिन आणि पायलचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, अवघ्या काही वेळातच झाले तुफान व्हायरल

जुबिन नौटियाल आणि पायल देव पुन्हा एक अनोखे लव्हसाँग सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Chetan Bodke

Jubin Nautiyal, Payal Dev New Song: ‘दिल लौटा दो’, ‘मेरी तरह’, ‘बरसात हो जाये’ आणि ‘मीठी मीठी’ यांसारखे हिट गाणे चाहत्यांना दिल्यानंतर जुबिन नौटियाल आणि पायल देव पुन्हा एक अनोखे लव्हसाँग सोशल मीडियावर शेअर केले आहे.

भूषण कुमार निर्मित, ‘प्यार होना ना था’ हे गाणे कुणाल वर्मा यांनी लिहिले असून पायल देव यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे.

या ट्रॅकचे वेगळेपण म्हणजे डिजिटल निर्माते Pixoury द्वारे संकल्पित केलेला म्युझिक व्हिडिओ, जुबिनच्या काही फोटोंनी निर्मित केलेला एक ॲनिमेटेड म्युझिक व्हिडिओ आहे, जो आज आपण पाहत असलेल्या रन-ऑफ-द-मिल म्युझिक व्हिडिओंपासून वेगळा आहे.

जुबिन गाण्याबद्दल म्हणतो, “हा एक प्रकारचा म्युझिक व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खास हृषिराज उर्फ पिक्सरीने ॲनिमेटेड केला असून खूपच अप्रतिम बनवला आहे. मला नेहमीच पायल देवसोबत काम करताना आनंद होतो. आम्ही अनेकदा एकत्र काम केले असून एकमेकांच्या कामाची पद्धत आम्हाला दोघांनाही माहित आहे. आम्‍हाला आशा आहे की प्रेक्षक आमच्‍या पूर्वीच्‍या गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही तसाच प्रतिसाद देतील.”

गायिका-संगीतकार पायल गाण्याविषयी म्हणते, “ ‘प्यार होना ना था’ हे एक साधे पण दमदार असे हे प्रेमगीत आहे. कुणाल वर्माने बरीच सुंदर गाणे लिहिली आहेत, तसेच हे सुद्धा गाणे सुद्धा सुंदर लिहिले आहे. ज्युबिन नौटियालने नेहमीप्रमाणेच हे देखील गाणे अप्रतिम गायले आहे.”

नुकतेच ‘प्यार होना ना था’ हा व्हिडिओ टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला असून गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT