Jolly LLB 3 Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, ३ दिवसांत केलं अर्धशतक

Jolly LLB 3 Box Office Collection Day 3 : 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने तीन दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने रविवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज झाला.

'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमारची तुफान कॉमेडी पाहायला मिळत आहे.

'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा 19 सप्टेंबरला रिलीज झाला. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसत आहे. यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी वकिलांच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच चित्रपटत सौरभ शुक्ला,अमृता राव आणि हुमा कुरेशी या कलाकार झळकले आहेत.

'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा 'जॉली एलएलबी 3' रिलीज होऊन अवघे तीन दिवस झाले आहेत. चित्रपटाने तीन दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काल तिसऱ्या दिवशी रविवारी देखील चित्रपटाचे शो खूप ठिकाणी हाऊसफुल पाहायला मिळाले आहेत. रविवारी चित्रपटाने किती कोटी कमावले , जाणून घेऊयात.

'जॉली एलएलबी 3'ने पहिली दिवशी 12.75 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3'ने तिसऱ्या दिवशी तब्बल 21 कोटींची कमाई केली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी 1 कोटींना वाढ झाली आहे. तीन दिवसांत चित्रपटाने 53.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता या कॉमेडी कोर्टरूम ड्रामाची यशस्वी घोडदौड 100 कोटींच्या दिशेने पाहायला मिळत आहे.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'जॉली एलएलबी 3' हा जॉली एलएलबी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. 'जॉली एलएलबी ' 2013 मध्ये आणि 'जॉली एलएलबी 2 ' चित्रपट 2017 ला रिलीज झाला. Pinkvilla च्या रिपोर्टनुसार, 2025 च्या बॉक्स ऑफिसवरील टॉप ओपनिंग वीकेंडमध्ये अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' आठव्या स्थानावर आहे.

  1. छावा - 108 कोटी रुपये

  2. वॉर 2 - 99 कोटी रुपये

  3. सैयारा - 83.25 कोटी रुपये

  4. हाऊसफुल - 79 कोटी रुपये

  5. सिकंदर - 67 कोटी रुपये

  6. स्काय फोर्स - 63.50 कोटी रुपये

  7. सितारे जमीन पर - 56.50 कोटी रुपये

  8. जॉली एलएलबी 3 - 52.50 कोटी रुपये

  9. रेड 2 - 49.25 कोटी रुपये

  10. केसरी चॅप्टर 2 - 29 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kohinoor Diamond : मौल्यवान आणि दुर्मिळ कोहिनूर हिऱ्याची किंमत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Chikhali Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १० लाखांची रोकड लंपास; चिखली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये तहसीलदाराच्या दालनातच शेतकऱ्याचा आत्महत्याची प्रयत्न

Navratri: नवरात्रीत पहिल्यांदा उपवास करताय? या चुका केल्यात तर उपवास होईल अपूर्ण

Buldhana Crime News : आश्रम शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरण, मुख्य आरोपीला ५ वर्षांची शिक्षा, १७ जण निर्दोष

SCROLL FOR NEXT