अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला झाली कोरोनाची लागण

एकामागोमाग एक असे अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यामध्ये सापडत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. एकामागोमाग एक असे अनेक कलाकार कोरोनाच्या (Corona) विळख्यामध्ये सापडत आहेत. आता बॉलिवूडचा (Bollywood) अ‍ॅक्शन सुपरस्टार जॉन अब्राहम (John Abraham) याला कोरोनाची लागण झाली आहे. जॉनची पत्नी (Wife) प्रिया हि देखील कोरोना पॉझिटीव्ह (Positive) आहे. सोमवारी जॉनने स्वत: सोशल मीडियावरून (Social media) माहिती दिली आहे. त्याच्यासह पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. (John Abraham corona positive)

हे देखील पहा-

इन्स्टाग्रामवर (Instagram) स्टोरीवर त्याने लिहिले आहे की, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यासह पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे. ३ दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर त्या संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजले आहे. यानंतर आम्ही चाचणी केली आणि त्यामध्ये आम्हा दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस (Vaccine) घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे आहेत. पण काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही देखील काळजी घ्या आणि मास्क घाला असे आवाहन जॉन अब्राहमने यावेळी केले आहे.

मागील काही दिवसामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना (celebrities) कोरोनाची लागण झाली आहे. करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महिम कपूर यांच्याबरोबरच अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर, तिचा पती करण बुलानी, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. २ दिवसांपूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकुरला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिनेही सोशल मीडियावरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगत स्वत:ला आयसोलेट करून घेतल्याचे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : या भाज्यांना कधीच देऊ नका जिऱ्याची फोडणी

Maharashtra Live News Update : बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Maval Heavy Rain : मुसळधार पावसाचा तडाखा; मावळ झाले जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

SCROLL FOR NEXT