Mami Film Festival Attend Bollywood Celebrity Instagram
मनोरंजन बातम्या

Mami Film Festival Attend Bollywood Celebrity: ‘मामि’मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी, प्रियंका चोप्रासह सोनम कपूर आणि बाबील खानच्या लूकने वेधलं लक्ष

Mami Film Festival Red Carpet: मामि फिल्म फेस्टिव्हलमध्ये फक्त चित्रपटांचीच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनचीही यावेळी चर्चा पाहायला मिळाली.

Chetan Bodke

Mami Film Festival Attend Bollywood Celebrity

वेगवेगळ्या आशयाचे आणि धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांना ‘मामि फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पाहायला मिळणार आहेत. २७ ऑक्टोबरपासून पुढचे दहा दिवस मुंबईतील अनेक सिनेमागृहांमध्ये ‘मामि’तील सहभागी चित्रपटांचं सादरीकरण होणार आहे. मामि अर्थात ‘मुंबई ॲकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस’. फक्त चित्रपटांचीच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही या कार्यक्रमामध्ये चर्चा पाहायला मिळाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. देसी गर्ल प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, राजकुमार राव, त्याची पत्नी पत्रलेखानेही हजेरी लावली होती. त्यासोबतच सैफ अली खान, करिश्मा कपूर, करिना कपूर, करण जोहर, सन्नी लियोनीसह अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती, प्रियंका चोप्राच्या लूकची. यावेळी अभिनेत्रीने व्हाईट रंगाचा सिक्वेन मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. त्यासोबतच अभिनेता राजकुमार राव आणि पत्नी पत्रलेखाच्या रोमँटिक लूकनेही सर्वांचेच लक्ष वेधले. (Bollywood)

जिओ मामि फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात राजकुमार राव आणि पत्नी पत्रलेखासोबत रोमँटिक पोजेसही दिल्या. राजकुमार रावने फेस्टिव्हलला चॉकलेटी रंगाचा सूट आणि पांढरा शर्ट परिधान केला होता. तर पत्रलेखाने गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या वनपिसमध्ये स्पॉट झाली होती, ज्यामध्ये तिने वेव्ही हेअरस्टाइल आणि स्टेटमेंट ज्वेलरी परिधान करुन आपला लूक पुर्ण केला होता.

फिल्म फेस्टिव्हलला फिल्ममेकर झोया अख्तरने ब्लॅक सिल्क वनपिस परिधान केला आहे. इरफान खानचा मुलगा बाबीलनेही यावेळी हजेरी लावली होती. त्याच्या लूकनेही चाहत्यांचे लक्ष वेधलेय. हा फिल्म फेस्टिव्हल २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईमध्ये पार पडणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

SCROLL FOR NEXT