सर्वेश मेवाडा दिग्दर्शित ‘तेजस’ काल बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. नुकताच सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या कमाईचा एक संभाव्य आकडा शेअर केला आहे. दरम्यान, ‘तेजस’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे, जाणून घेऊया.
‘सॅल्कनिक’च्या अहवालानुसार, कंगना रणौतच्या ‘तेजस’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी फक्त १.२५ कोटी रुपयांची कमाई केली. हा कमाईचा आकडा खरंतर अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. चित्रपटाचा विषय पाहता तो यापेक्षा जास्त व चांगली ओपनिंग करेल, अशी निर्मात्यांसह चित्रपटातील कलाकारांची अपेक्षा होती. चित्रपटाला भारतामध्ये तब्बल १३०० स्क्रीन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. खरं तर चित्रपटाचे प्री- बुकिंग खूप कमी झाली असून चित्रपटाची कमाई सुद्धा कमी झाली. जरीही चित्रपट पहिल्या दिवशी अपयशी ठरला असला तरी पहिल्या विकेंडला हा चित्रपट दिलासादायक कमाई करेल, असं काही ट्रेड ॲनालिस्टचे मत आहे.
पंगा गर्ल मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाची चर्चा तिच्या फर्स्ट लूकपासून चाहत्यांमध्ये होत आहे. चित्रपटामध्ये कंगना रणौतने वैमानिक तेजस गिल यांची भूमिका साकारली. RSVP निर्मित चित्रपटाने लूक आणि डायलॉगमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले. सर्वेश मेवाडा दिग्दर्शित आणि लिखित चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कंगना व्यतिरिक्त अंशुल चौहान, वरुण मित्रा, पंकज त्रिपाठी आणि आशिष विद्यार्थी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जबरदस्त ॲक्शन चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. चित्रपटामध्ये कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.
कंगना रनौतच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे एकूण ४५ कोटींच्या आसपास बजेट आहे. निर्मात्यांच्या मते, चित्रपट या विकेंडला दिलासादायक कमाई करेल, अशी आशा आहे. चित्रपटाने कामगिरीच्या बाबतीत जर अपयशी ठरला तर कंगनाला हा फारच मोठा धक्का बसू शकतो. तिचा हा सलग तिसरा फ्लॉप चित्रपट ठरू शकतो. या आधी कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ आणि ‘धाकड’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. कंगानाचा लवकरच ‘इमरजेन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तिने चित्रपटामध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पात्र साकारलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची धुरा कंगनानेच सांभाळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.