Jhimma 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2: अख्ख्या इंडस्ट्रीला 'मराठी पोरीं'ची भुरळ; 'झिम्मा २' ची सोशल मीडियावर अफलातून क्रेझ

Jhimma 2 Song: काही दिवसांपूर्वी चित्रपटातील 'मराठी पोरी' हे गाणं प्रदर्शित झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jhimma 2 Marathi Pori Song :

'झिम्मा' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच 'झिम्मा २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटातील एका गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. 'मराठी पोरी' या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. या गाण्यावर अनेक जण रिल्स बनवताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी चित्रपटातील 'मराठी पोरी' हे गाणं प्रदर्शित झाले. या गाण्यावर चित्रपटातील सर्व कलाकारांना खूप छान डान्स केला आहे. या गाण्याची क्रेझ मराठी कलाकरांमध्येही पाहायला मिळत आहे. कलाकरांनी गाण्याच्या स्टेपवर रील्स बनवल्या आहेत.

'मराठी पोरी' या गाण्यावर सर्वजण रिल्स बनवताना दिसत आहे. गाण्यातील हुक स्टेपवर ताल धरत अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने या गाण्यावर डान्स केला होता. सिद्धार्थ मितालीनंतर आता पुजा सावंत आणि तिची बहिण रुचिरा सावंत, अभिषेक देशमुख-कृतिका देव, शिवानी सुर्वे-अंजिक्य ननावरे, ललित प्रभाकर- क्षिती जोग या सर्व कलाकारांनी रील्स बनवल्या आहेत.

कलाकारांसोबतच अनेक चाहत्यांनीदेखील गाण्यावर ताल धरला आहे. सातासमुद्रापार अनेक चाहत्यांनी या गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार केल्या आहे. चाहते उत्साहात या गाण्यावर रील्स बनवत आहेत.

'झिम्मा 2' चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात क्षिती जोग, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे हे कलाकार दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar Tourism : वीकेंडचा प्लान ठरला; भाईंदरमध्ये लपलाय सुंदर किनारा, पाहताच मनाला भुरळ पडेल

Kristina Coco: तर मी कबूल करते की मी वेश्या आहे...; व्हायरल झालेल्या रशियन मुलीला अश्रू अनावर

Rain Alert : पुढील ५ दिवस अत्यंत महत्वाचे, महाराष्ट्रासह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Live News Update: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

भारतातील सर्वात महागड्या चित्राचा लिलाव, वी.एस. गायतोंडे यांच्या कलेला मिळाले 67.08 कोटी रुपये, VIDEO

SCROLL FOR NEXT