Hemangi Kavi On Hemant Dhome Film Jhimma 2 Instagram
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi On Jhimma 2: ‘मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली...’; ‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट

Hemangi Kavi Post: अभिनेत्री हेमांगी कवी हिने ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत तिने दिग्दर्शकासह चित्रपटातील कलाकाराचे कौतुक केले आहे.

Chetan Bodke

Hemangi Kavi On Hemant Dhome Film Jhimma 2

‘झिम्मा २’ (Jhimma 2) या मराठी चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा होत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाचे कौतुक फक्त समीक्षक किंवा प्रेक्षकच करत नाही तर अनेक सेलिब्रिटीमंडळी सुद्धा चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवी हिने ‘झिम्मा २’ पाहिला असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाचे कौतुक केले आहे.

‘झिम्मा २’ चित्रपट पाहिल्यानंतर हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली! हेमंत ढोमे अरे काय कमाल सिनेमा आहे! खरं बोलायचं तर, ‘झिम्मा १’ पेक्षा ‘झिम्मा २’ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही ‘झिम्मा १’ पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि रिलेटेबल! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीण न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड एन्जॉय केला मी हा चित्रपट! निर्मिती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस?’

‘आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला लिड किंवा हिरोईन म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच कॅटेगरिज करतो. हॉलिवूड किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना लिड म्हणूनच पाहिलं जातं. अवॉर्ड्ससाठी मेन कॅटेगरीमध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तु कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू! सुहास ताई, हीच गोष्ट ‘तु तिथं मी’च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो लाईन मारायचा सीन! मी तर शिट्टीच हाणली थिएटरमध्ये. क्या बात है!’ (Marathi Film)

‘रिंकू महादेव राजगुरु... दुसरं कौतुक करावंसं वाटतं ते रिंकू राजगुरुचं. खुप समजून- उमजून काम केलंय. टिपीकल सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. सीनवर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए! एक एक सीन चोपलाय तिघींनी! जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हांला ‘झिम्मा ३’ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय!’

‘ते तू बाकी चित्रपट करत रहा पण झिम्मा युनिव्हर्सला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा पार्ट फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्यासगळ्या टीमकडे. इरावती कर्णिक आणि क्षितिज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!’ असं म्हणत तिने चित्रपटातील सर्वच कलाकारांसह दिग्दर्शकांचेही कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT