Jhimma 2 Marathi Pori Song Released Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Pori Song: नव्या रूपातलं बाईपण ‘मराठी पोरी’मध्ये दिसणार, ‘झिम्मा २’चं नवं गाणं रिलीज

Jhimma 2 Song Released: ‘झिम्मा २’च्या टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटातलं ‘मराठी पोरी’ पहिलं वहिलं गाणं भेटीला आलं आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Marathi Pori Song Released

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता त्या टीझरनंतर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटातलं पहिलं वहिलं गाणं भेटीला आलं आहे. सध्या सर्वत्र ‘झिम्मा’मय वातावरण असून ते अधिक बहरवण्यासाठी चित्रपटातलं पार्टी अँथम साँग रिलीज झालं आहे. ‘मराठी पोरी’ असं त्या गाण्याचे बोल असून सध्या सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या ‘मराठी पोरी’या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिलेय. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे.

‘झिम्मा’ प्रमाणेच ‘झिम्मा २’च्याही गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. खरंतर गाण्याच्या टायटलवरुनच आपल्याला गाण्याचा भावार्थ कळतो.

‘इंदू’च्या ७५व्या वाढदिवसाचे निमित्त साधत सर्वच महिला अनोख्या स्वॅगमध्ये दिसत आहे. ‘मराठी पोरी’ गाण्यातील सर्वच महिलांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये सर्व पात्र दिसत असल्यामुळे गाण्याची प्रचंड चर्चा होतेय.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका असलेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT