Vaishali Samant News: वैशाली सामंतचं नव्या क्षेत्रात पदार्पण, ‘या’ नाटकातून करणार नव्या कामाचा श्रीगणेशा

Vaishali Samant And Maitthily Jawkar News: या नाटकातील धाकड गाण्याला (थीम साँग) गायिका वैशालीने संगीत दिलं असून तिने स्वतः ते गाणं गायलंय. या नाटकातून मैथ्थिली दिग्दर्शकीय पदार्पण करतेय.
Marathi Natak Ashich Aahe Chitta Joshi
Marathi Natak Ashich Aahe Chitta JoshiInstagram
Published On

Ashich Ahe Chitta Joshi Theater News: आपल्या धडाडीच्या स्वभावातून अभिनेत्री मैथ्थिली जावकर सतत काहीतरी करत असते. अभिनय आणि निर्मिती नंतर आता ती लेखन दिग्दर्शनाकडे वळली आहे. ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. मनोरंजना सोबतच, आपली महान संस्कॄती व परंपरा यांची महती सांगणार हे नाटक आहे. या नाटकातून दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या मैथ्थिलीला साथ मिळाली ती गायिका वैशाली सामंत हिची.

Marathi Natak Ashich Aahe Chitta Joshi
Karan Johar Question: ‘तू गे आहेस का?’ चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरचे विचित्र उत्तर, थेट म्हणाला; तुला...

गाण्यातून आणि संगीतातून आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या वैशालीने प्रथमच एका नाटकासाठी गीत संगीताची जबाबदारी सांभाळली. ह्या नाटकातील धाकड गीताला (थीम साँग) गायिका वैशाली हिने संगीत दिलंय, आणि स्वतः ते गाणं गायलंय. या नाटकाच्या निमित्ताने मैथ्थिलीच दिग्दर्शकीय पदार्पण आणि वैशालीच नाटकासाठी प्रथमच संगीत देणं हा योग ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाने जुळवून आणला आहे. (Theater)

या गाण्याविषयी बोलताना वैशाली सांगते, हे गाणं करताना खूप धमाल आली. राजेश बामुगडे यांनी हे गीत खूप चांगल्यारीतीने शब्दबद्ध केलं आहे. आपल्या हक्कासाठी लढणार्‍या स्त्री पात्रासाठी अतिशय चपखल असं हे गाणं करताना एका स्त्री दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन मला अधिक भावला. त्यामुळे हे गाणं आणि मैथ्थिली सोबत काम करणं माझ्यासाठी ही खूप छान अनुभव होता. (Marathi Actress)

Marathi Natak Ashich Aahe Chitta Joshi
Jai Dudhane Car Stolen: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याच्या कारमधून झाली चोरी, घटनेविषयी माहिती देताना म्हणाला...

मैथ्थिली सांगते, राज्यस्तरीय नाट्य लेखनाच्या एका स्पर्धेसाठी मी भाग घेतला होता. त्यात १७५ स्क्रिप्ट मधून माझं हे नाटक तिसरं आलं. यातूनच मला हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या एका चित्रपटाच्या निमित्ताने वैशालीची भेट झाली होती. तिची एनर्जी आणि कामाचं पॅशन नाटकाच्या गाण्यासाठी परफेक्ट वाटली. आणि खरंच तिने हे गाणं खूप मस्त सादर केलं आहे. (Entertainment News)

ओम साईनाथ प्रॉडक्शन्स निर्मित, संस्कार भारती च्या सहयोगाने, स्मित हरी प्रकाशित वेगळ्या धाटणीच्या या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असून मैथ्थिली जावकर सोबत रणजीत जोग, रुचिर गुरव, रचना कदम यांच्याही नाटकात भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com