Jhalak Dikhala Ja  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhalak Dikhala Ja: 'गश्मीर नसता तर..' आईसोबत धकधक गर्ल माधुरीने केले गश्मिरचे कौतुक...

गश्मिरने 'झलक दिखला जा' मध्ये केलेल्या डान्सने प्रेक्षकांसोबतच परिक्षकांची पोचपावती मिळवत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी अभिनेता गश्मिर महाजन प्रेक्षकांच्यासमोर अनेक कार्यक्रमांमधून कधी परीक्षकाच्या भूमिकेत तर कधी स्पर्धकाच्या भूमिकेत दिसतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी कलर्स टिव्हीवर सुरु झालेला 'झलक दिखला जा' कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमात काही मराठमोळे कलाकारही आपला नृत्याविष्कार दाखवणार आहेत. त्यातलाच एक स्पर्धक गश्मिर महाजन हा आहे. गश्मिरने 'झलक दिखला जा' मध्ये केलेल्या डान्सने प्रेक्षकांसोबतच परिक्षकांची पोचपावती मिळवत आहे.

या कार्यक्रमात गश्मिरच्या डान्स मधून त्याचा जीवन संघर्ष दाखवण्यात आला आहे. गश्मिरचा हा नृत्याविष्कार पाहताना उपस्थितांसह सर्वांचेच डोळे पाणावले. त्यावेळी गश्मिरची आई सांगते की, 'गश्मिर नसता तर आम्ही इथपर्यंत नसतो.' त्यानंतर माधुरी दिक्षितने ही 'गश्मिर तू तुझ्या आयुष्याचा सुलतान आहेस.' असे बोलून त्याच्या डान्सचे कौतूक केले.

गश्मिर वयाच्या १५ वर्षापासून डान्स अॅकेडमी चालवत आहे. त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी बऱ्याच डान्सर्सला आपल्या डान्स अॅकेडमीतून घडवले आहे. कौटुंबिक स्थिती हालाकीची असल्याने डान्स अॅकेडमी चालू केली होती, त्याच अॅकेडमीने त्याला आनंदाचे दिवस दाखवले आहेत. सोबतच 'डान्स महाराष्ट्र डान्स' या लहान मुलांच्या कार्यक्रमात गश्मिरने परीक्षकाचे स्थान भूषवले होते.

Edit By- Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT