Dilip Joshi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dilip Joshi : 45 दिवसांत 16 किलो वजन घटवलं, वाचा जेठालालचा फिटनेस फंडा

Dilip Joshi Weight Loss: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते दिलीप जोशी यांनी वजन कमी केल्याचा आपला अनुभव सांगितला आहे. त्यांचा डाएट प्लान जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) कॉमेडी शो प्रेक्षकांचे अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे. त्यांना खळखळवून हसवत आहे. या शोमुळे यातील कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. जेठालाल, टपू आणि दयाबेन ही पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहे. सध्या जेठालालचे पात्र खूप गाजत आहे. हे पात्र अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.

दिलीप जोशी (Dilip Joshi) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी वजन कमी करण्याचा किस्सा सांगितला आहे. दिलीप जोशी यांनी 45 दिवसांत 16 किलो वजन कमी (Weight Loss) केल होते. तेही कोणतेही डाएट न करता. त्यांच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेऊयात.

दिलीप जोशी यांनी मुलाखतीत सांगितल्यानुसार, त्यांनी 1992मध्ये 'हुनहुनशी हुनशिलाल' या चित्रपटासाठी वजन कमी केले. या चित्रपटात त्यांना शास्त्रज्ञाची भूमिका साकारली. त्यासाठी त्यांना वजन कमी करण्यास सांगण्यात आले होते. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दिलीप जोशी यांनी फाफडा आणि जलेबी खाणाऱ्या जेठालालची भूमिका साकारली आहे.

फिटनेस सीक्रेट काय?

दिलीप जोशी दररोज 45 मिनिटांचा जॉगिंग करायचे. असे त्यांनी जवळपास दीड महिना चालू ठेवले. दिलीप जोशी मरीन ड्राइव्हला धावायला जायचे. त्यांच्या मते धावणे फक्त व्यायाम नसून एक छान अनुभव आहे. ज्यामुळे महागड्या फिटनेस ट्रेनर आणि कोणत्याही डाएटशिवाय दिलीप जोशी यांनी वजन कमी केले. धावल्यामुळे शरीरातील जास्त कॅलरीज बर्न होतात. क्रॅश डाएटमुळे कधीतरी आरोग्याला धोका पोहचतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : विजयसिंह पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, त्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या - मुधोजी राजे भोसले

Manoj Jarange: सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे भडकले|VIDEO

Amit Shah : अमित शहा यांचं शीर धडावेगळं करून टेबलावर ठेवा; महिला खासदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Jalna Accident: मुलीला आजारपणाने ग्रासलं, रुग्णालयात नेताना काळाचा घाला; ५ जणांच्या अख्ख्या कुटुंबाचा शेवट

SCROLL FOR NEXT