Shah Rukh Khan Jawan Pre View Get Million Views Instagram @girijaoakgodbole
मनोरंजन बातम्या

Jawan Prevue Views : पठानपेक्षा 'जवान'ला तगडा रिस्पॉन्स ; रोमँटिक शाहरूखपेक्षा व्हिलन लूकला 'जबरा फॅन'ची पसंती

Jawan Trailer View: 'जवान'च्या प्री-रिलीज ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Pooja Dange

Jawan Trailer Get 112 Million Views : पठान चित्रपटानंतर त्याचे फॅन्स त्याच्या आगामी चित्रपट डंकी आणि जवानची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच शाहरुख खानच्या जवानचा प्री-रिलीज ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या प्री-रिलीज ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

जवानच्या प्री-रिलीज ट्रेलरने एक नवीन आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत कोणत्याही चित्रपट इतके अद्याप व्ह्यूज मिळाले नाहीत. जवानच्या प्रिव्ह्यूवला ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

गेल्या २४ तासात जवानचा प्रिव्ह्युव्ह व्हिडिओ सर्वाधिक वेळा पहिला गेला आहे. शाहरुख खानची जगभरात असलेली फॅन फॅलोविंग आणि चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता यामुळे हे शक्य झाले आहे.

रेड चिलीज एंटरटेनमेंटने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती शेअर केली आहे. तसेच लिहिलं आहे, 'तुमचं प्रेम असंच वाढू द्या! सर्वांचे खूप आभार.'

जवानचा प्रिव्हयु काल सोशल मीडियावर ट्रेंड होत होता. २४ तासात या व्हिडिओ फक्त युट्युबवर ४९ मिलियन व्ह्युजचा टप्पा पार केला आहे. प्रभास आदिपुरुष चित्रपटाच्या प्रिव्हयुला अंदाजे १०९ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.

शाहरुखची विविध रूपं

ट्रेलरमध्य शाहरुखची विविध रूप दाखविण्यात आली. कधी तो पोलीस अधिकारी दिसतो. तर कधी मास्क लावून धमकावताना दिसतो. तर शाहरुखच्या एका लूकमध्ये त्याने हातात भाला घेतला आहे आणि त्याच्या अंगाला पट्ट्या गुंडाळलेल्या आहेत.

तर जवानमधील गाण्याची झलक दाखविण्यात आली आहे यामध्ये शारूखचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. बोटात सिंहाची अंगठी आणि अर्ध्य चेहऱ्याला पट्ट्या असा व्हिलन लूक देखील चित्रपटामध्ये आहे. तर ट्रेलच्या शेवटी शाहरुखचा टक्कल असलेला लूक पाहायला मिळत आहे.

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा हिनं शाहरूखसोबत एकत्रित स्क्रिन शेयर केली आहे. गिरीजा हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. मात्र अभिनेत्री या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे तरी गुलदस्त्यातच आहे. प्रिव्ह्यू व्हिडिओत तिने हातात बंदूक घेवुन शाहरुखसोबत ॲक्शन सीन करताना दिसली.

शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती स्टारर जवान चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनला आहे. अॅटली दिग्दर्शित, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्माते. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: व्यवसायात भरभराट होईल पण पैसाही तितकाच खर्च होईल; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

SCROLL FOR NEXT