Jawan Story Could Be Inspired From This Amitabh Bachchan Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan Film Story: काय सांगता..! शाहरुखचा जवान अमिताभ बच्चनच्या या सिनेमावर आधारित.. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा

शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या एका जुन्या चित्रपटावरुन प्रेरित असल्याच्या चर्चा सुरू आहे

Chetan Bodke

Jawan Story Could Be Inspired From This Amitabh Bachchan Film: पठानला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. सध्या सोशल मीडियासह सर्वत्र शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील फर्स्ट लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. २०२३ मधला ‘जवान’ चित्रपट या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांनी केले आहे.

मध्यंतरी मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं असून अनेकदा चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटो लीक झाले आहेत. आता या चित्रपटाबद्दल एक वेगळीच माहिती समोर आली आहे. ‘जवान’ची कथा नेमकी काय असू शकते, याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या एका जुन्या चित्रपटावरुन प्रेरित असल्याच्या चर्चा सुरू आहे. (Bollywood Film)

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर फिल्म जवान, बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन स्टारर फिल्म आखरी रास्ता पासून त्याची मूळ कथा घेतली असल्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, पण अखरी रास्ता हा कमल हासनच्या ओरु कैदीयिन डायरी नावाच्या प्रतिष्ठित तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. (Bollywood News)

मिळालेल्या माहितीनुसार, "हा रिमेक किंवा कॉपी नसून या चित्रपटापासून प्रेरणा घेत एक वेगळं कथानक मांडल्याचही सांगितलं जात आहे. ऍटली यांनी या चित्रपटाचे मुख्य कथानक घेतले आहे. हा चित्रपट ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शि होणार आहे. येत्या २ जूनलाच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. " (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT