बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. ट्रेलर आणि गाणे प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत होता. अवघे काही दिवसच शिल्लक असताना, चित्रपटाला सध्या बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे. सध्या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची तुफान चर्चा सुरू आहे. शाहरुखचा हा बहुचर्चित चित्रपट दोन मोठ्या बिगबजेट चित्रपटांचा विक्रम मोडीत काढणार अशी सध्या चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या सध्याच्या कमाईचे आकडे पाहता, हा चित्रपट पहिल्याच दिवशी शाहरूखच्या ‘पठान’चा आणि सनी देओलच्या 'गदर २'चा विक्रम मोडीत काढणार अशी चर्चा सुरू आहे.
शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित होताच दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला होता. चित्रपटाची चर्चा फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगभरात सुरू आहे. शाहरुखचा हा बिगबजेट चित्रपटांपैकी एक चित्रपट असून या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवान पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई करेल असे सध्या बोलले जात आहे. चित्रपटाची कथा, गाण्यांना मिळत असलेला प्रतिसाद आणि चित्रपटाच्या ट्रेलरला मिळत असलेला प्रतिसाद, यामुळे ‘जवान’ मोठी कमाई करेल असे बोलले जात आहे.
काही ट्रेड ॲनालिटिक्सकडून, ॲटली दिग्दर्शित हा चित्रपट तब्बल ६० कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. तर, काही मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर ७० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. हा आकडा केवळ हिंदीसाठी आहे. साऊथ आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनमुळे हा आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. (Film)
पहिल्याच दिवशी शाहरूखच्या ‘पठान’ने पहिल्याच दिवशी एकूण ५७ कोटींची कमाई केली होती. तर दाक्षिणात्य भाषेत या चित्रपटाने २ कोटींची कमाई केली होती. तर ‘गदर २’ने पहिल्याच ४१ कोटींची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाईच्या बाबतीत ‘पठान’ पहिल्या क्रमांकावर असून ‘गदर २’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता ‘जवान’ चित्रपट पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.