Zinda Banda Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zinda Banda Song Out: भव्य सेट, अफलातून हूक स्टेप, जवानमधलं पहिलं ‘झिंदा बंदा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Jawan Film 1st Song Release: नुकतंच सोशल मीडियावर ‘जवान’मधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

Chetan Bodke

Zinda Banda Song Release: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘जवान’ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकतंच सोशल मीडियावर या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘जवान’मधील प्रदर्शित झालेल्या गाण्याचे नाव ‘झिंदा बंदा’ असं आहे.

प्रदर्शित झालेल्या गाण्यात प्रेक्षकांना शाहरूखचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळत आहे. अवघ्या काही वेळातच चित्रपटातील पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाण्याबद्दल बोलायचे तर, गाण्याच्या सुरूवातीलाच शाहरूख एका घोळक्यातुन एका खास अंदाजात डान्स करताना दिसत आहे. गाण्यामध्ये शाहरूखने लाल रंगाचा शर्ट आणि जिन्स पॅंट परिधान केलेली दिसत आहे.

शाहरूखच्या मागे अनेक डान्सर डान्स करताना दिसत असून शाहरूखच्या जिंदा बंदा या गाण्यातील हूक स्टेप्सने चाहत्यांचे लक्ष वेधले. शाहरूखच्या या जबरदस्त डान्स स्टेपने गाण्याला चार चाँद लावले आहेत.

जिंदा बंदा या गाण्यात शाहरूखच्या मागे १००० हून अधिक डान्सर्स मुली डान्स करताना दिसत आहेत. या डान्सर्स मुली चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, मदुराई, मुंबईसह भारतातील वेगवेगळ्या शहरातील या मुली असून हे गाणं तब्बल पाच दिवसातच शूट करण्यात आलं आहे. हे गाणं अनिरूद्धने आपल्या आवाजात संगीतबद्ध केलंय. शाहरुखसोबत प्रियामणी, सान्या मल्होत्रा ​​आणि जवान मधील इतर अभिनेत्री देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT