शाहरुख खान आणि नयनाताराच्या ‘जवान’चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज एक महिना झाला असला तरीही अजूनही चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायमच आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १० चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला होता. चित्रपटाला फक्त भारतातच नाही तर जगभरात भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना झाला असून चित्रपटाने जगभरात ११०० कोटींची कमाई करत स्वत:च्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे.
शाहरुख खानच्या ‘जवान’ने देशातच नाही तर परदेशी बॉक्स ऑफिसवरही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामध्ये विक्रम राठोड आणि त्याच्या मुलाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ११०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने जगभरामध्ये आतापर्यंत एकूण ११०३.२७ कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरामध्ये ११०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यासोबतच ‘जवान’ने स्वत:च्या नावावर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून विक्रम केला आहे.
शुक्रवारी ‘जवान’च्या दिग्दर्शकांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट शेअर करताना त्यांनी सोशल मीडियावर कॅप्शन दिले होते. दिग्दर्शक कॅप्शनमध्ये म्हणतात, “ ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर दररोज रेकॉर्ड बनवतो आणि तोडतोय. आताच तुमची तिकिटे बुक करा! आणि थिएटरमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये ‘जवान’ चित्रपट पाहा.” जवानने जगभरात आतापर्यंत एकूण ११०३. २७ कोटींचा टप्पा पार केला आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘जवान’ चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. शुक्रवारी नाशिक जवळच्या मालेगावात ‘जवान’ चित्रपट पाहायला गेलेल्या एका चाहत्याने कमलदीप थिएटरमध्ये फटाके फोडल्याची घटना घडलीय. या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शाहरुखच्या स्टारडमची चर्चा होतेय. थिएटरमध्ये चित्रपटातील गाणं सुरु होताच काही फॅन्सने थिएटरमध्ये फटाके फोडले. फटाके पाहून अनेकांना पळता भुई थोडी झाली होती. थिएटरमध्ये फटाके फोडल्यानंतर हा शो मधूनच बंद करण्यात आला. पोलिसांनी फटाके फोडणाऱ्यांवर शहरातील रमजान पुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही सुरू केली आहे.
ॲटली दिग्दर्शित ‘जवान’मध्ये, शाहरुखसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा, प्रियामणीसह अनेक अभिनेत्रींनी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.