Jaswinder Bhalla Death x
मनोरंजन बातम्या

Actor Death News : लोकप्रिय अभिनेत्याचे निधन, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

Jaswinder Bhalla Death : लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार जसविंदर भल्ला यांचे ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Yash Shirke

Jaswinder Bhalla : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि पंजाबी अभिनेते जसविंदर भल्ला यांचे निधन झाले आहे. आज (२२ ऑगस्ट) त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २३ ऑगस्ट रोजी मोहालीच्या बलोंगी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. जसविंदर भल्ला यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

जसविंदर भल्ला हे पंजाबी सिनेसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांनी १९८८ मध्ये एका काॅमेडी शोने कारकिर्दीची सुरुवात केली होती. दुल्ला भट्टी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. विनोदी मालिका आणि पंजाबी चित्रपटांमधील विनोदी पात्र हे जसविंदर भल्ला यांची ओळख बनले होते.

४ मे १९६० रोजी लुधियाना शहरामध्ये जसविंदर भल्ला यांचा जन्म झाला होता. त्याचे वडील मास्टर बहादूर सिंह भल्ला हे बर्मालीपूर गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दोराहाच्या वरिष्ठ माध्यमिक शाळेत झाले होते. त्यानंतर त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठातून बीएससी आणि एमएससी केले. मेरठच्या चौधरी चरण सिंह पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमधून त्यांनी पीएचडीची पदवी मिळवली होती.

जसविंदर भल्ला यांनी मालूल ठीक है, जिजा जी, जिन्हे मेरा दिल लुटेया, पॉवर कट, कबड्डी वन्स अगेन, अपन फिर मिलेंगे, मेल कारा दे रब्बा, कॅरी ऑन जट्टा, जट्ट अँड ज्युलिएट आणि जट्ट एअरवेज यांसारख्या अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भल्ला यांच्या निधनामुळे पंजाबी मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electricity Prices: देशभरात वीज होणार स्वस्त; पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये महायुतीबाबत अद्यापही अनिश्चितता

Onion Rings Recipe: 31thसाठी बनवा कोल्ड ड्रिंकसोबत खायचे टेस्टी आणि क्रिस्पी ऑनियन रिंग्स, वाचा सोपी रेसिपी

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजी; कोणाच्या वाटेला किती जागा? वाचा

Maharashtra Politics : खासदार असदुद्दीन ओवैसी यांना मोठा धक्का; प्रदेश कार्याध्यक्षांनी दिला पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT