Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : जान्हवीकडे चाहत्याने मागितले ३५६८ रुपये; म्हणाला, तुझ्यामुळे बायकोने...

Janhvi Killekar : 'बिग बॉस मराठी' सध्या प्रेक्षकांचा आवडता शो झाला आहे. भाऊच्या धक्क्याची प्रेक्षक वाट पाहत असतात. कारण शनिवार-रविवारी मनोरंजनाचा धमाका होतो.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी सीजन ५ ' (Bigg Boss Marathi ) सध्या जोरदार गाजत आहे. सर्वत्र बिग बॉस मराठीची चर्चा पाहायला मिळत आहे. यंदा भाऊच्या धक्क्यावर धमाल गोष्ट घडली. रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) जान्हवी किल्लेकरला धक्क्यावर बसण्याची परवानगी दिली. गेले अनेक दिवस जान्हवी तिच्या वाईट वर्तणुकीमुळे जेलमध्ये होती. जान्हवीने (Janhvi Killekar) वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला होता. यामुळे तिला भाऊच्या धक्यावर बसण्यास बंदी घातली होती.

सध्या सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा एक धमाल व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भाऊच्या धक्क्यावरचा आहे. यात तुम्हाला जान्हवी चाहत्याची कमेंट वाचताना दिसत आहे. हा चाहत्याची कमेंट वाचून सर्वांनाच हसू अनावर झाले. या कमेंटमध्ये चाहत्याने लिहिलं आहे की, "जान्हवी बाहेर आल्यावर मला तुमचा नंबर द्या कारण तुमच्यामुळे माझे ३५६८ रुपयाचे नुकसान झाले आहे. मी नवीन घेतलेला काचेचा डिनर सेट तुमच्यामुळे बायकोच्या हातून फुटला. कारण जेव्हा तो डिनर सेट बायको हातात घेऊन उभी होती, नेमका तेव्हाच तुम्ही घनःश्याम वर मोठ्यानेओरडलात आणि दचकून तिच्या हातातून तो पडला आणि नंतर फुटला. याला फक्त जबाबदार तुम्ही असल्यामुळे प्लीज माझे ३५६८ रुपये देऊन टाका." जान्हवीने हा मेसेज वाचताच सर्वांचे हसू फुटले. यावर जान्हवीने पैसे देण्यासाठी कबूल केले आहे. जान्हवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धमाल कमेंट्स येत आहेत.

सध्या बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. याचे नाव संग्राम चौगुले आहे. हा कोल्हापूरला राहणारा बॉडीबिल्डर आहे. संग्रामला फिटनेस खूप प्रिय आहे. २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली. आता हा नवा स्पर्धक बिग बॉसच्या घरात किती राडा घालणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT