Janhvi Kapoor an Oops moment  Saam TV
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Get Trapped: गं बाई जरा सावर स्वत:ला; जान्हवी रेड कार्पेटवर गेला तोल अन् झाली ट्रोल

Janhvi Kapoor at Style Icons Awards: जान्हवी रेड कार्पेटवर चालत असताना तिच्या कपड्यांमध्ये ट्रॅप झाली.

Pooja Dange

Janhvi Kapoor Photos: जान्हवी कपूर तिच्या लूक्स, ड्रेस आणि अभिनयाने चर्चेत असते. जान्हवी बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचे भरपूर फॅन्स देखील आहेत. तर जान्हवीचा कथित प्रियकर शिखर पहाडियामुळे चर्चेत आहे. नुकतीच जान्हवीने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. जिथे तिचा एक छोटासा अपघात झाला.

या सोहळ्याला जान्हवी कपूर पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसत होती. जान्हवी रेड कार्पेटवर चालत असताना तिच्या कपड्यांमध्ये ट्रॅप झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, तुम्ही जान्हवी रेड कार्पेटवर जाताना आणि तिच्या ड्रेसवर अडखळताना पाहू शकतो.

हे घडत असताना तिची स्टायलिस्ट पटकन ते दुरुस्त येतो. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर घडलेल्या या घटनेचा अभिनेत्रीच्या आत्मविश्वासावर अजिबात डगमगला नाही.

पापाराझी देखील “आराम से (हळू)” असे जान्हवीला म्हटले. नंतर तिने फोटोग्राफर्सशी गप्पाही मारल्या. जेव्हा फोटोग्राफर्सनी तिच्या लुकची प्रशंसा केली. तेव्हा ती म्हणाली, "तुम्ही आजकाल जरा जास्त ओव्हरअॅक्टिंग करत आहात, माझं लक्ष आहे तुमच्याकडे."

जान्हवीने एक सुंदर हाय-स्लिट पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने शायनी मेकअपचा निवडला आणि केस मोकळे सोडले होते.

अलिकडेच जान्हवीने अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तरुण ताहिलियानीच्या गेटअपमध्ये दिसत आहे. या फोटोला तिने “Kissie” असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टला तिचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे लाईक्सचा करत आहे.

पण एका कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने हार्ट आणि हार्ट-आय इमोजीसह फोटोवर कमेंट केली दिली. जान्हवी कपूर किंवा शिखर पहाडिया या दोघांनीही त्यांच्या नात्याची सांगितले नाही. परंतु ते दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.

जान्हवी कपूर दिग्दर्शक नितेश तिवारीच्या 'बावल' या चित्रपटात वरुण धवनसह दिसणार आहे. तसेच राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही देखील दिसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या मिलीमध्ये जान्हवी शेवटची दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT