Pushpa 2 Teaser: शेर आया शेर, 'पुष्पा 2'च्या दमदार टीझरसह अल्लू अर्जुनच्या लूकची चर्चा

Allu Arjun and Rashmika Mandanna's Pushpa 2: सुपरस्टार अल्लू अर्जुनच मोस्ट चित्रपट पुष्पा २ म्हणजेच 'पुष्प द रुल'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Producer gave an update about Pushpa The Rule
Producer gave an update about Pushpa The Rule Saam Tv

Allu Arjun's Pushpa 2 Teaser Out: सुपरस्टार अल्लू अर्जुनच मोस्ट चित्रपट पुष्पा २ म्हणजेच 'पुष्प द रुल'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची चित्रपटाबद्दची उत्सुकता वाढविण्यासाठी निर्माते वेगेवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा छोटा प्रोमो, काल चित्रपटाचे पोस्टर शेअर आहे.

आज अल्लू अर्जुनाचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आधी त्याच्या चाहत्यांना निर्मात्यांनी गिफ्ट दिले आहे. निर्मात्यांनीं पुष्पा २चा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुन खूप खतरनाक दिसत आहे.

टीझरची सुरूवात अल्लू अर्जुनचा शोध घेण्यापासून होते. जंगलात, शहरात, शेतात, गल्ली-बोलण्यात पोलीस पुष्पाचा शोध घेत असतात. पुष्पा गायब असल्याची सर्वत्र चर्चा सुरु असते. लोकांसाठी देवदूत असलेला पुष्पा पोलिसांसाठी चोर आहे आणि पोलीस त्याचा तपास करत आहेत. पुष्प पोलीस कोठडीत नसल्याने लोक काळजी करू लागतात आणि त्यासाठी पोलिसांविरोधात आंदोलन करतात. पोलीस या लोकांवर लाठी हल्ला करतात.

Producer gave an update about Pushpa The Rule
Neha Marda: 'बालिका वधू' फेम अभिनेत्री तब्ब्ल ११ वर्षांनी झाली आई; नेहा मर्दाने दिला गोंडस मुलीला जन्म

टीझरमधील अल्लू अर्जुनचा लूक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 'पुष्पा द राईज'मधील त्याच्या लूक आणि त्या पत्राचे वैशिष्ट्य सर्वांना भावले होते. पहिल्या भागात पुष्पाची विनोदी शैली दिसली होती. तर यावेळी पुष्पा एका भयावह अवतारात दिसत आहे. चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.

पोस्टरमध्ये दिसत असलेल्या पुष्पाच्या गळ्यात लिंबू- मिरचीच्या माळा दिसत आहेत. तसेच त्याच्या गळ्यात फुलांचा माळा, भरपूर दागिने दिसत आहेत. बोटात अंगठ्या, हातात बांगड्या, निळी साडी आणि ब्रोकेड ब्लाऊज नाकात नाथ आणि निळे रंगाचे शरीर आणि चेहरा असा अल्लू अर्जुनाचा लूक आहे.

सुकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता चित्रपट पोस्ट प्रॉडक्शन फेजमध्ये आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना टीझर प्रदर्शित करून भेट दिली आहे. टीझर पाहूनच प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक दिसत आहेत.

'पुष्पा 2: द रुल' मध्ये प्रेक्षकांना पुष्पा राज्य करताना दिसणार आहे. 'पुष्पा: द राइज'मध्ये अल्लू अर्जुन एका निडर व्यक्तिरेखेत दिसला होता. लाल चंदनाची तस्करी करायचा आणि त्यातूनच त्याने हळूहळू प्रगती साधली. पण त्याची हि स्टोरी त्याच्या आगामी चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

'पुष्पा 2: द रुल' हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मिश्री मूव्ही मेकर्स निर्मित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com