बॉलिवूडची जान्हवी नेहमीच तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करत असते.अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. यंदाच्या नवरात्रीत जान्हवीच्या ड्रेसची प्रचंड चर्चा झाली. जान्हवी फक्त वेस्टर्न लुकमध्ये सुंदर दिसते असे नाही, तर जान्हवी साड्यांच्या विविध स्टाईलमध्येही तितकीच सुंदर दिसते. जान्हवी कपूरची आई प्रसिद्ध अभिनेत्री 'श्रीदेवी' सारखी हुबेहूब दिसते. तसेच जान्हवी तिच्या स्किन आणि डाऐटकडे विशेष लक्ष देते.
आपल्या स्टाईलप्रमाणेच आपल्या डाएट प्लॅनमध्ये नक्की काय हवे आणि फिटनेस कसा जपावा? या सगळ्यांचा जान्हवी बारकाईने विचार करते. तुम्हाला ही जान्हवीसारखे फिट राहायचे असेल तर जान्हवीच्या फिटनेस आणि डाएटचे रहस्य जाणून घ्या.
जान्हवी फिट राहण्यासाठी आपल्या डाएटकडे व्यवस्थित लक्ष देते. फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश जान्हवी आपल्या डाएटमध्ये नेहमी करते. याशिवाय दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, एग व्हाईट आणि सलाड ती खाते. असा लाईट डिनर ती करते. त्यामुळे ती सुंदर फिगर मिळवू शकली आहे. जान्हवीने गेल्या काही वर्षात आपल्या अभिनयानेही प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तर आपली फिगर परफेक्ट राहावी यासाठीही ती अत्यंत मेहनत करत आहे.
खाण्याबरोबर जान्हवी फीटनेसकडे जास्त लक्ष देते, जान्हवी रोज योगा करते. कारण मानसिक ताण असल्यावर आपले वजन वाढू शकते. जान्हवी पिलाटे एक्सरसाईजचा समावेश तिच्या दिवसात करत असते. सोबतच फिट बॉडीसाठी वेट ट्रेनिंग जान्हवी करत असते. नेहमी उत्साही जान्हवी स्विमिंग आणि जॉगिंग करते. अशा पद्धतीने जान्हवी नेहमी सुंदर आणि फिट दिसते.
Written By : Sakshi Sunil Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.