Jacqueline Fernandez  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez Video : "दम दम..."; जॅकलिन फर्नांडिसचं नवीन गाणं रिलीज, तुम्ही पाहिलेत का?

Jacqueline Fernandez New Song : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप कमी वेळात या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. आजवर तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या अभिनयाचे लाखो दिवाने आहेत. तिने चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अलिकडेच 'हाऊसफुल 5'मध्ये पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

आता मात्र जॅकलीन एका वेगळ्या अंदाज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच जॅकलीनचा म्युझिक व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जॅकलीन फर्नांडिसचे 'दम दम' (Dum Dum Song ) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात जॅकलीनचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणे असीस कौरने गायले आहे.

जॅकलीनने या गाण्याच्या झलकचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो पाहून चाहते घायाळ झाले आहे. तिच्या गाण्यावर कमेंट्स, लाइक्स आणि व्ह्यूजचा पाऊस पडत आहे. चेहऱ्यावरचा अदा आणि गाण्यातील बिंधास्तपणा नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. नेटकरी तिचे हावभाव, डान्स, लूक ,मेकअप यांचे कौतुक करत आहेत. तिच्या गाण्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कमी वेळात या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आले आहेत.

'हाऊसफुल 5'

जॅकलिन फर्नांडिसचा 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'हाऊसफुल 5'हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. या चित्रपटात फुल कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे.'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, कीर्ती सेनन, रितेश देशमुख, जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, जॉन इब्राहिम ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT