The Kashmir files Movie saam tv
मनोरंजन बातम्या

The Kashmir Files: नदाव लॅपिड यांचे इफ्फीतील वादावर मौन सोडले, सांगितले खरं कारण

नदाव यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून या इस्रायली दिग्दर्शकावर टीका करण्यात आली. दरम्यान, नादव लॅपिड यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावरील खरे कारण सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

The Kashmir Files: गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2022) इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी प्रमुख ज्युरी म्हणून भाग घेतला होता. यावेळी त्यांनी 'द कश्मीर फाइल्स' या बॉलिवूड चित्रपटाला हास्यास्पद आणि अपप्रचार असल्याचे म्हटले होते. नदाव यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून या इस्रायली दिग्दर्शकावर टीका करण्यात आली. दरम्यान, नादव लॅपिड यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावरील खरे कारण सांगितले आहे.

इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी अलीकडेच IFFI 2022 मध्ये 'द काश्मीर फाइल्स'चित्रपटासंबंधीत वादग्रस्त विधान केले होते. एका इंग्रजी संकेतस्थळाला नादव लॅपिड यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'माझ्यासाठी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून असे बोलणे आणि राजकीय विधान करणे सोपे नव्हते.

मला माहीत होते की ही एक अशी घटना आहे, जी त्या देशासोबत संबंधित आहे. तिथला प्रत्येक जण सरकारचे कौतुक करतोय. मी तिथे पाहुणा होतो, मी इथल्या ज्युरीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मला चांगली वागणूक दिली गेली आणि मी तिथेच त्यांच्या इव्हेंटमध्ये त्यांच्यावर टीका करणं, सोपे नव्हतं..'

सोबतच नदव पुढे सांगतात, त्यावेळी माझ्या मनात भीती होती, अस्वस्थता जाणवत होती, तरीही मी बोलण्याचा प्रयत्न केला. मी बोलेल याचा परिणाम काय होईल हे मला माहित नव्हतं. म्हणून मनात भिती ठेवत ते वक्तव्य केलं. सोबतच कालचा संपूर्ण दिवस मी भीतीतच घालवला. त्या हॉलमध्ये हजारो लोक बसले होते.

स्थानिक कलाकारांना पाहून सगळे आनंदी होते, बरेच जण सरकारच्या नावाने जयजयकार करत होते. ज्या देशात मनातलं बोलण्याची किंवा सत्य बोलण्याची क्षमता कमी होत आहे, त्या राष्ट्रात कोणीतरी बोलणे महत्वाचे आहे. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला, तेव्हा मी तसा चित्रपट इस्त्रायलमध्ये बनवण्याची कल्पना करू शकलो नाही.

'द कश्मीर फाइल्स'वर वादग्रस्त विधान केल्यानंतर नदाव लॅपिड यांच्यावर सोशल मीडियापासून तळागाळापर्यंत अशा सर्व स्तरांतून त्यांच्यावर टिका केली जात आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी नादव लॅपिडवर खोटे असल्याचा आरोप करत आहे. एवढेच नाही तर इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनीही या इस्रायली चित्रपट निर्मात्यावर ताशेरे ओढले असून त्यांच्याविरोधात खुले पत्रही लिहिले आहे.

या सोहळ्यात नदाव लॅपिड म्हणतात,“या महोत्सवतील १५ वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट मतप्रवाहाचा प्रचार करणारा (Propogenda) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे खूपच अयोग्य आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT