Shenaz Treasury SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shenaz Treasury : मुंबईतील वन बेडरूमचं भाडं बालीतील व्हिलापेक्षा जास्त; अभिनेत्रीनं व्यक्ती केली खंत, नेटकऱ्यांकडून होतेय ट्रोल

Shenaz Treasury Video : 'इश्क विश्क' फेम बॉलिवूड अभिनेत्री शहनाज ट्रेजरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने मुंबई आणि बालीची तुलना केली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'इश्क विश्क' फेम बॉलिवूड अभिनेत्री शहनाज ट्रेजरी (Shenaz Treasury ) हिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ही एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. ती ट्रॅव्हलिंग संबंधित अनेक व्हिडीओ शेअर करते. अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिने व्हिडीओमध्ये म्हणाली की, "माझ्या मैत्रिणीच्या बालीतील व्हिलाच्या भाड्यापेक्षा मी मुंबईत माझ्या वन बेडरूमच्या अपार्टमेंटचे जास्त भाडे देते."

अभिनेत्री शहनाज ट्रेजरी ही लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि इन्फ्लुएंसर आहे. लोक बालीमध्ये का स्थलांतरित होत आहेत? या प्रश्नाचे उत्तर तिने एका व्हिडीओतून चाहत्यांना दिले आहे. अभिनेत्री शहनाज ट्रेजरीने बालीतील एका सुंदर व्हिलाचा व्हिडिओ टूर शेअर केला आहे. त्याची तुलना मुंबईतील तिच्या लहान अपार्टमेंटशी केली आहे. तिने सांगितले की, खाजगी स्विमिंग पूल आणि बाग असलेल्या या प्रशस्त व्हिलाचे मासिक भाडे मुंबईतील (Mumbai ) तिच्या लहान १ बीएचके अपार्टमेंटपेक्षा कमी आहे.

शहनाज बालीतील (Bali) तिच्या मैत्रिणीला भेट दिली आणि दोन्ही शहरांमधील राहणीमानाच्या खर्चाची तुलना केली. तिने याचा एक व्हिडीओ शेअर करून त्या व्हिडीओला मोठे कॅप्शन लिहिलं आहे. ज्यात तिने लोक बालीमध्ये का राहतात याचे कारण सात मुद्दे लिहून सांगितले आहे.

शहनाज ट्रेजरी पोस्ट कॅप्शन

"इतके लोक बालीमध्ये का स्थलांतरित होत आहेत?

१. राहणीमानाचा खर्च vs जीवनशैली

मुंबई, लंडन किंवा लॉस एंजेलिसमध्ये १ बीएचके च्या सेम किंमतीत (किंवा कमी) स्विमिंग पूल असलेल्या व्हिलामध्ये तुम्ही राहू शकता.

जेवण, मालिश आणि वाहतूक परवडणारी आहे. परंतु जीवनाचा दर्जा उच्च वाटतो.

२. रिमोट वर्क हेवन

परदेशी समुदाय, सह-कार्यस्थळे, जलद वाय-फाय

बाली हे उद्योजक आणि डिजिटल निर्मात्यांसाठी एक जागतिक केंद्र बनले आहे जे कुठूनही काम करू शकतात.

३. वेलनेस कॅपिटल

योग, निरोगी कॅफे, साउंड हीलिंग, रिट्रीट - बाली हे मुळात वेलनेस प्लेग्राउंड आहे.

शहरी जीवनामुळे थकलेले लोक अनेकदा येथे गती कमी करण्यासाठी आणि शांतीसाठी येतात.

४. सर्जनशील ऊर्जा

वातावरण शांत, मोकळे आणि सर्जनशील आहे. प्रत्येकजण काहीतरी काम करत आहे. उदा. ब्रँड, पुस्तक, व्यवसाय.

तुमच्याभोवती अशी लोक असतात जे, रात्री ९ ते ५ वाजेपर्यंत त्यांचे स्वप्नातील जीवन घडवण्यासाठी बाहेर पडले आहेत.

५. निसर्ग + अध्यात्म

समुद्रकिनारे, धबधबे, ज्वालामुखी आणि एक खोलवरची आध्यात्मिक संस्कृती.

बालीची हिंदूमुळे म्हणजे मंदिरे, विधी, अर्पण करणे...थांबणे आणि जोडण्याचे हे प्रतीक आहे.

६. व्हिसा पर्याय

इंडोनेशियात दीर्घकाळ राहण्यासाठी डिजिटल नोमॅड व्हिसा देत आहे, ज्यामुळे परदेशी लोकांना महिने किंवा वर्षे येथे स्थायिक होणे सोपे होते.

७. सामाजिक जीवन + डेटिंग

जगभरातील लोकांना भेटणे सोपे आहे. मग तुम्ही बीच क्लबमध्ये असाल, ब्रेथवर्क क्लासमध्ये असाल किंवा नेटवर्किंग ब्रंचमध्ये असाल.

मजा, फ्लर्टिंग आणि स्वातंत्र्याचे मिश्रण.

हो, मी याबद्दल विचार करत आहे पण मला माझ्या पालकांपासून दूर राहायचे नाही आहे. मी अनेक काळ(पालकांचे अर्धे आयुष्य ) भारताबाहेर राहिली आहे. आता ते वयाने मोठे झाले आहेत त्यामुळे मला त्यांच्यासोबत राहायचे आहे. "

शहनाज ट्रेजरीच्या या व्हिडीओमुळे ती ट्रोल होत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहेत. एक युजर म्हणतो की, "या किमतीच्या निम्म्या किमतीमध्ये मी माझ्या गावी तिप्पट आकाराचे घर बांधू शकतो. तेव्हा त्याची तुलना कशी करता येईल?" तर दुसरा युजर बोलतो की, "ही चुकीची तुलना आहे... भारतात इतर चांगल्या ठिकाणीही तिप्पट स्वस्त जागा मिळते. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minister Gogawale Video: शिंदेसेनेच्या आमदारानंतर मंत्र्यावर कॅशबॉम्ब, दळवींनंतर गोगावलेंचा नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT