Salman Khan
Salman Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

IIFA Awards 2022: 'या' अभिनेत्याने मागितली सलमान खानची माफी, व्हिडिओ झाला व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : दिग्गज अभिनेत्यांच्या अप्रतिम नृत्यामुळं प्रेक्षकांच्या भुवया उंचावणारा आणि त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पुरस्कार सोहळा म्हणजे आयफा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं 'कान्स फिल्म फेस्टिवल'आणि 'मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल' नुकतचं यशस्वीरित्या पार पडले. प्रेक्षकांचाही या फिल्म फेस्टिवलला उदंड प्रतिसाद लाभला. मात्र, आता या फेस्टिवल नंतर 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' म्हणजेच आयफा (IIFA) ची सुरुवात अबूधाबीला झाली असून पुरस्कार सोहळा २ ते ४ जूनला असणार आहे.

आयफाच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये सलमान खान (Salman Khan) ,रितेश देशमुख (Riteish Deshmukh), नोरा फतेही, शाहिद कपूर (Shahid Kapoor), दिव्या खोसला कुमार, हनी सिंह (Honey Singh) यांसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळं बॉलिवूडमध्ये एकही पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. परंतु, यंदाच्या वर्षी 'IIFA 2022' ची दिमाखदार सुरुवात झाली आहे.

३ जूनला होणाऱ्या IIFA 2022 साठी फराह खान (Farah Khan)आणि अपारशक्ति खुराना (Aparshakti Khurana) सूत्रसंचालन करणार आहेत. तर ४ जूनला रितेश देशमुख , सलमान खान, आणि मनीष पॉल हे सूत्रसंचालन करणार आहेत. या सोहळ्यामध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक मजेदार किस्से होत आहेत. असाच एक गमतीशीर व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये रितेश देखमुख सलमान खानची माफी मागताना दिसतं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटी पत्रकार विरल भयानीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. व्हिडिओमध्ये मनीष पॉल सलमान खानला म्हणतो, तुम्ही स्टेजवर असलातं की खूप मज्जा येते , त्यावर रितेश देशमुख म्हणतो की, मनीष मला तुला सांगयचे आहे की, तू सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक आहेस,रितेश पुन्हा एकदा म्हणतो की 'मी पुन्हा सांगेन मनीष तू सूत्रसंचालनामध्ये आतापर्यंत सर्वोत्तम आहेत'. तेव्हा हातवारे करत सलमान खान विचारतो आणि मी ? त्यावर रितेश म्हणतो,सॉरी मिस्टेक,तर सलमान म्हणतो की, मी स्वतःही विसरलो कधी-कधी मी पण सूत्रसंचालन करतो.

'IIFA 2022'२ जून ते ४ जून या कालावधीत येस आयलंडमध्ये आयोजित केले जात आहे. अनेक सेलिब्रिटी आधीच अबुधाबीला पोहोचले आहेत, तर काही आज येथे पोहोचणार आहेत. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) देखील या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच अभिषेक बच्चन या सोहळ्यामध्ये परफॉर्म देखील करणार आहे. त्याचबरोबर शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, सारा अली खान, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार आणि नोरा फतेही हे कलाकारही झळकणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Crime : ६ वर्षांच्या पोटच्या पोरासाठी आईच बनली काळ; नवऱ्यासोबत भांडणानंतर मगरीच्या कळपात फेकलं

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

SCROLL FOR NEXT