हृदयस्पर्शी! केकेंसाठी मुलगी ताम्रा हिची सोशल पोस्ट वाचून डोळ्यांत येईल पाणी

केके यांच्या मृत्यूबाबत संशयाची सुई फिरकत होती. त्यानंतर....
singer kk death
singer kk death Saam Tv

मुंबई : प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath ) यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले केके सर्वांना सोडून गेल्याने सिनेविश्वात (Film Industry) दु:खाचा डोंगर कोसळला. मंगळवारी कोलकाता येथील महाविद्यालयाच्या कार्यक्रमानंतर केके यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांना रुग्णालयात नेताच मृत घोषीत करण्यात आले. केके यांच्या मृत्यूबाबत संशयाची सुई फिरकत होती. मात्र, काल रुग्णालयातून सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर केके यांचा मृत्यू हृदयविकारानेच (Heart attack) झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, केके यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

singer kk death
Singer KK : केके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर; पोस्टमॉटर्म रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

केके यांची पत्नी ज्योती कृष्णा तसेच मुले नकुल आणि ताम्रा यांनाही केके यांच्या जाण्याचं अतीव दु:ख झाले आहे. केकेंची मुलगी ताम्राने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अंत्यसंस्काराबाबत माहिती दिली होती. ताम्राने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंत्यदर्शनाची स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये कृष्णकुमार कुन्नथ यांच्या फोटोसह अंत्यसंस्काराची माहिती देण्यात होती . ही स्टोरी शेअर करताना केके यांची मुलगी ताम्राने 'लव्ह यू फॉरेव्हर डॅड' असं लिहिलं होतं.

 kk daughter taamra post
kk daughter taamra postInstagram

केकेंची मुलगी ताम्रालाही संगीताची प्रचंड आवड...

हम दील दे चुके सनम सिनेमातील 'तडप तडप के' या गाण्यामुळं केके यांचा उमदा कलाकाराचा ठसा सिनेविश्वात निर्माण झाला. त्यानंतर केके यांनी मागे वळून न पाहता एकापेक्षा एक सुपरहीट गाण्यांचा सीलसीलाच सुरु ठेवला. केकेंना संगीत क्षेत्रात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्यांची मुगली ताम्रानेही तिच्या वडीलांकडू संगीताचे धडे गिरवले. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही गायक, निर्माता आणि संगीतकार असं प्रोफाईल अपडेट केलं आहे. याशिवाय ताम्राने तिचे गायनाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

केकेंच्या स्मृतींना उजाळा...

केके यांच्या निधनांतर अख्ख्या बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. केकेंच्या अकाली एक्झिटमुळं त्यांच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. केके यंदा मार्च महिन्यात 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेले होते. त्यांनी तिथे खूप धमाल केली होती. यावेळी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांची लव्ह स्टोरीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्या क्षणांच्या आठवणीत उपस्थित कलाकार रमल्यानंतर काहीसे भावुकही झाले. विशाल भारद्वाज यांनाही केके यांच्यासोबतचे क्षण आठवले आणि त्यांनाही शोक अनावर झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com