पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती उघड!

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मारेकरी म्हणून एकच नाव समोर होते ते म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई.
Sidhu moose wala case News Updates
Sidhu moose wala case News UpdatesSaam Tv

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर मारेकरी म्हणून एकच नाव समोर होते ते म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई(Lawrence Bishnoi). या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. परंतु आता या हत्येप्रकरणी एक माहिती समोर येत आहे. काही वेळेपूर्वी सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत होते की, या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने हा खून आपणच केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे. परंतु आता ANI या वृत्तसंस्थेच्या हवालानुसार, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची कबुली दिलेली नाही. (Sidhu moose wala case)

बिश्नोई यांनी पोलिसांना सांगितले की, मुसेवाला यांची हत्या बदला घेण्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, गायकाच्या हत्येत आपला हात नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. याशिवाय, मुसेवाला यांच्या हत्येनंतर अनेक शार्प-शूटर नेपाळला पळून गेल्याचा संशय आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक मुझफ्फरनगर आणि नेपाळच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने गायकाच्या हत्येत आपला हात नाहीये असे सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले होते. पंजाबी गायक मूसवाला यांची 29 मे, रविवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ते त्यांच्या महिंद्रा थार कारने मानसा जिल्ह्यात बाहेर जात होते. मुसेवालासोबत त्याचे मित्रही गाडीत बसलेले होते. तर ते या हल्ल्यात गोळीबारात जखमी झाले होते.

तर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या एका दिवसानंतर त्याने आपल्या वकिलामार्फत आपली सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. दिल्लीच्या पटियाला कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, "आरोपी हा विद्यार्थी राजकीय नेता (Student Political Leader) आहे आणि त्याच्यावर पंजाब आणि चंदीगड राज्यांमध्ये राजकीय भांडणांमुळे अनेक खोटे गुन्हे दाखल आहेत." यामुळे आरोपीला पंजाब पोलिसांकडून फेक एन्काउंटरर होण्याची भीती आहे असे त्याने सांगितले होते.

Sidhu moose wala case News Updates
यवतमाळ: गावात विहीरी तीन पण, त्याही कोरड्या, हंडाभर पाण्याकरिता महिलांची वणवण

तर, यापूर्वी कॅनडात असलेला गँगस्टर गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सांगण्यात येते की, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी त्याचे जवळचे संबंध आहेत. ब्रारने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, गुंड विकी मिड्दुखेडा याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपण मूसेवाला यांची हत्या केली.

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव आता समोर येत आहे. त्याने सुपारी घेऊन त्याने तिहार तुरुंगात कट रचला अशीही शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यांच्या वकिलाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर त्यांनी मागे घेण्यापूर्वी सुनावणी होऊ शकते. तर, मुसेवाला यांच्या हत्येचे प्रकरण उकलण्यासाठी तपास पथकात बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी एसआयटी पथक (SIT) पुन्हा नव्याने बनवण्यात आले होते. माहितीनुसार, यात सहा सदस्य आहेत. ज्यामध्ये IGP PAP जसकरण सिंह, AID AGTF गुरमीत सिंह चौहान आणि SSP मानसा गौरव तोरा यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com