यवतमाळ: गावात विहीरी तीन पण, त्याही कोरड्या, हंडाभर पाण्याकरिता महिलांची वणवण

हंडाभर पाण्यासाठी रोजंदारी पाडून पाण्यासाठी उमरी पठार येथील महिला आणि पुरूषांना घरी राहावं लागत असून गावापासून दिड ते दोन किमी अंतरावरून पाणी आणावं लागत आहे.
Yavatmal Water Issue
Yavatmal Water Issueसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ: हंडाभर पाण्यासाठी रोजंदारी पाडून पाण्यासाठी उमरी पठार येथील महिला आणि पुरूषांना घरी राहावं लागत असून गावापासून दिड ते दोन किमी अंतरावरून पाणी आणावं लागत आहे. विशेष म्हणजे, ज्या शेत शिवारातील विहिरीवरून पाणी आणताय त्या विहिरी जवळ विघुत खांबावरील जिवंत तार तुटून खाली पडून असल्याने जिवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.

उमरी पठार या गावात फेब्रुवारी महिन्यांपासन तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात सार्वजनिक पाण्याच्या तीन विहीरी आहेत. मात्र त्या फेब्रुवारी महिन्यातच कोरड्या पडल्या. परिणामी गावातील महिलांना रोजमजुरी पाडून पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागते.

Yavatmal Water Issue
शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांकडे लक्ष द्या; राऊतांचा भाजपवर हल्ला

निसर्गाच्या दृष्ट चक्रात कायमच अडकलेल्या उमरी पठारच्या ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजली आहे. पाणीटंचाई धरण उशाला अन् कोरड घशाला याची प्रचिती उमरी पठार येथील नागरिकांना येत असून अनेक वर्षा पासून ग्रामस्थांच्या मानगुटीवर बसलेल्या पाणी टंचाईचे भूत काही केल्या उतरण्यास तयार नाही. उमरी पठार पासून हक्केच्या अंतरावर अरूणावती धरण आहे.

हे देखील पाहा-

मात्र, गाव पठारवर वसलेला असल्याने धरणातील पाण्याचा कवडीचाही लाभ गावाला मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने कायमस्वरुपी गावातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी अरूणावती धरणातून पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्यास गावाला नक्की फायदा होईल आणि कायमची पाणी टंचाई करिता करावी लागणारी भटकंती थांबेल. भल्या पहाटे विहिरीवरून पाणी आणण्यासाठी घरातील लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वच शेत शिवारात डोक्यावर हंडा घेऊन दिसतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com