'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळत आहे. मालिकेत इंद्रायणी शाळा सुरू करण्याचा नवा संकल्प करते. पण तिच्या कीर्तनाच्या दरम्यान मोहितराव तिच्यावर सरकारी जमीन घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करतो. गावकरी मात्र इंद्रायणीच्या पाठीशी उभे राहतात आणि मोहितराव मंदिराबाहेर काढतात. नंतर इंद्रायणी अधिकार्यांसोबत बैठक निश्चित करते जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.
'इंद्रायणी' मालिकेत आनंदी इंदूला घरातच थांबवण्याचे अनेक प्रयत्न करते. पण इंद्रायणी अधोक्षजच्या मदतीने हुशारीने घराबाहेर पडते आणि यशस्वी बैठक घेते. पण आता येत्या भागांमध्ये इंदूसमोर पुंडलिक कुरकुंबे नावाचे नवे आव्हान उभे ठाकणार आहे. एक श्रीमंत उद्योगपती मंदिराच्या ट्रस्टला मोठी देणगी देण्यासाठी येतो. पण ती देणगी फक्त दिग्रसकर परंपरेच्या अधिकृत वारसालाच दिली जाईल, असं स्पष्ट करतो. आनंदीला वाटते हा हक्क अधोक्षजचा असावा म्हणून ती तातडीने एक कमिटी मीटिंग बोलावते आणि अधोक्षजला वारस म्हणून घोषित करण्याची इच्छा व्यक्त करते.
व्यंकू महाराज मात्र सांगतात की, ही जबाबदारी पात्र व्यक्तीला द्यायला हवी. यावर आनंदी ठामपणे म्हणते की, "अधोक्षज वारस झाला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील..." दरम्यान वाड्यात सुरू असलेल्या या वादाची चर्चा संपूर्ण गावात जोरात सुरू असते. त्याच वेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो, ज्यात अधोक्षजची वारस म्हणून निवड झाल्याची थट्टा केली जाते. हा प्रकार पाहून इंद्रायणीला खूप वाईट वाटेत. हे सगळं कोण करतंय याचा ती शोध घेऊ लागते. शोध घेत असतानाच तिला कळतं की 'पुंडलिक' नावाचा एक व्यक्ती या सर्व प्रकारामागे आहे.
पुंडलिक विठुच्यावाडीत विठ्ठल मंदिरात कीर्तनासाठी उभा राहतो आणि तिथूनच अधोक्षजच्या वारसा हक्काला थेट आव्हान देतो. कीर्तनकार परंपरा चालवण्यासाठी अधोक्षज सक्षम नाही, असं तो बोलतो. इंद्रायणी ठामपणे पुंडलिकला इशारा देते की अधोक्षजच्या दोषावरून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. पण गावातल्या गैरसमजांना आळा बसावा आणि अधोक्षजच्या क्षमतांविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून ती पुंडलिकचं आव्हान अधोक्षजच्या वतीने स्वीकारते.
पुंडलिकच्या येण्याने मालिका कोणते नवीन वळण घेणार, अधोक्षज आव्हान पूर्ण करू शकेल का? हे सर्व पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'इंद्रायणी' मालिका संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.