Indrayani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत वाहू लागले प्रेमाचे वारे; गोपाळ देणार आपल्या प्रेमाची कबुली, पाहा VIDEO

Indrayani Marathi Serial Update : 'इंद्रायणी' मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गोपाळ इंदूजवळ आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

Shreya Maskar

आता 'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत नवीन वळण पाहायला मिळणार आहे. 'इंद्रायणी' मालिका ही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत इंदू मोहितरावांनी दिलेले आव्हान स्वीकारते. "पुढच्या एका वर्षात मी विठूच्या वाडीत शाळा सुरू करून दाखवेन!" इंदू असे वचन देते. आता इंदू हे वचन कसं पूर्ण करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

गोपाळ, अधू आणि संपूर्ण गावाची साथ तिला कशी मिळणार? इंदूचे हे वचन मालिकेला नवं वळण देणार आहे. अशात आता मालिकेत अजून एक ट्विस्ट येणार आहे. गोपाळ इंदूवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार आहे. पण, दुसरीकडे अधूला देखील इंदू आवडते असे चित्र दिसत आहे. 'इंद्रायणी' मालिकेत व्यंकू महाराज आणि इंद्रायणी आपल्या कीर्तनातून मोहितरावचा खरा चेहरा गावासमोर आणतात. यामुळेच मोहितराव चिडतो. त्याची इंदूवर आधीपासूनच वाईट नजर असते.

'इंद्रायणी' मालिकेत मोहितराव स्वतःच्या अपमानाचा बदला घ्यायचा ठरवतो. मोहितराव इंदूवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो. तिथे गोपाळ येतो आणि इंदूला त्याच्या तावडीतून सोडवतो. गोपाळ मोहितरावला बजावून सांगतो की, "माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे." गोपाळच्या प्रेमाच्या कबुलीनंतर मालिकेत काय घडणार? तसेच इंदू त्यावर काय उत्तर देणार? गोपाळ - इंदूचे प्रेम फुलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोहितरावाचा इंदूला विरोध असल्याने तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे. इंदू गावात शाळा उघडण्याचं आव्हान व्यंकू महाराज, गोपाळ, अधू आणि फँटया गँगच्या सहाय्याने कसे पूर्ण करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Maharashtra News Live Update: महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल - मंत्री संजय शिरसाट

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Marathi Serial: 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT