'इंद्रायणी' (Indrayani ) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. निरागसपण जोपासणारी तरीही खोडकर अशी इंदू आपल्या सर्वांना भावली. इंदूची लहान वयातील समज, तिचा युक्तिवाद आणि विठू रायावरील निस्सीम भक्ती हे आपण सगळ्यांनीच पाहिली. अनेक संकटे आणि अडथळे पार करताना तिला विठू रायाची साथ लाभली. तो तिचा पाठीराखा बनला. तिची फंट्या गँग आणि व्यंकू महाराज यांच्या खंबीर साथीने इंदूने त्यानां सहजपणे पार केलं.
इंदूच्या सुख दुःखात, तिच्या आनंदाच्या क्षणात या संपूर्ण प्रवासात आपण सगळेच साक्षीदार होतो. पण, आता अनेक वर्ष सरून गेली आहेत. बऱ्याच गोष्टी विठूच्या वाडीत घडल्या आहेत. जसा एखाद्या गोष्टीत नवा अध्याय सुरू होतो. अगदी तसेच इंदूच्या आयुष्यात देखील झाले आहे. इंदूच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आता आला आहे. आपली इंदू मोठी झाली आहे.
आता नव्या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी विठुरायाच्या साक्षीने इंदू सज्ज झाली आहे. प्रेम आणि भक्तीचा नवा प्रवाह इंद्रायणी 10 मार्चपासून संध्याकाळी 7.00 वाजता कलर्स मराठीवर सुरू होत आहे. मोठ्या इंदूची भूमिका साकारणार आहे कांची शिंदे तर गोपाळच्या भूमिकेत स्वामींनी मालिकेतून आपल्या भेटीस आलेला चिन्मय पटवर्धन आणि अधू निशांत पवार असणार आहे. याचसोबत आनंदीबाई म्हणजेच अनिता दाते, व्यंकू महाराज म्हणजेच स्वानंद बर्वे देखील मालिकेचा भाग असणार आहेत.
मोठ्या इंदूची भूमिका साकारणारी कांची शिंदे (Kanchi Shinde) म्हणाली, "आयुष्यात एकदातरी मुख्य भूमिका करायचे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असते. जेव्हा इंद्रायणी ही मालिका आली होती. तेव्हाच मला असं वाटलं होतं की जर पुढे मागे ही मुलगी मोठी झाली तर हिचे पात्र साकारण्याची संधी मला मिळावी अशी प्रार्थना मी केली होती. तेव्हापासून मी मालिका बघायला सुरूवात केली होती. विठुरायासोबत माझे एक अनोखं नाते तयार झाले. या पात्रासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी लोककला शिकले आहे. भारूड, जागरण, गोंधळ, कीर्तन या सगळ्यांची ओळख मला लहानपणापासून झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर आहे."
कांची शिंदे पुढे म्हणाली, " गायनात माझा जो बाज आहे तो मला या मालिकेत नक्कीच मदत करत आहे. कीर्तन करताना मला उपयोगी पडतो आहे. किर्तनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मी खूप शिकते आहे. एक माणूस म्हणून पण माझ्यात बदल होतो आहे. इंदू मध्ये किती आपलेपणा आहे. विठूरायाबद्दलची तिची जी भक्ती आहे ती वाखाण्याजोगी आहे. लहान इंदू खूपच निरागस आहे ती काहीच ठरवून करत नाही."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.