Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेची उंच भरारी, ३०० भाग झाले पूर्ण

Indrayani Update : मराठी लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी'चे नुकतेच ३०० भाग पूर्ण झाले आहेत. ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
Indrayani Update
IndrayaniSAAM TV
Published On

प्रेक्षकांची आवडती मालिका 'इंद्रायणी'ने (Indrayani) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आनंदी बाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत बऱ्याच घटना बघायला मिळाल्या आहेत. इंदूचा संघर्षमय प्रवास त्यात आनंदीबाई निर्माण करत असलेले कठीण प्रसंग हे सगळंच चर्चेत असतं. तर दुसरीकडे, आपल्याला विठूच्या वाडीत इंदू आणि फँटया गॅंग बरीच धम्माल मस्ती करताना देखील दिसतात.

मालिकेमध्ये इंदूचा बाल कीर्तनकार बनण्याचा प्रवास सुरू झाला आणि इंदू आनंदीच्या विळख्यात अजूनच अडकत गेली. इंदूचा आजवर दु:स्वास करणारी आनंदीबाई अचानक इंदूच्या बाजूने उभी राहते हे जरा खटकणारेच वाटले. इंदूला कीर्तनकार बनविण्यामागचा आनंदीबाईंचा हेतू काही वेगळाच आहे, हे व्यंकू महाराजांना गोपाळने समजावले. आनंदीबाईंच्या या अचानक झालेल्या बदला मागचे नक्की कारण त्यांना देखील महाराजांना कळाले.

स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आणि पैश्याच्या हव्यासापोटी आनंदी इंदूचा वापर करत आहेत हे खूपच चुकीचं आहे हे देखील समजविण्याचा प्रयत्न व्यंकू महाराज करताना दिसून आले. आता आंनदीबाईंचा खरा चेहरा व्यंकू महाराज इंदूच्या समोर आणू शकतील का? हे पाहणे रंजक असणार आहे. आता 'इंद्रायणी' मालिकेने ३०० भागांचा पल्ला गाठला आहे. कलर्स मराठीवर ही मालिका संध्याकाळी ७.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Indrayani
Indrayani

व्यंकू महाराजांची भूमिका साकारणारा स्वानंद बर्वे म्हणाला," इंद्रायणी मालिकेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत याचा खूप आनंद आहे. याआधी जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये मी चोळप्पाचे पात्र साकारले होते आणि आता मला व्यंकू महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये काम करत असताना मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. चोळप्पाची व्यक्तिरेखा साकारणे आणि आता व्यंकू महाराजांची भूमिका करणे या दोन्हींमध्ये खूप फरक होता. कारण चोळप्पाच्या व्यक्तिरेखेला एक ऐतिहासिक बाज, संदर्भ होता. पण, व्यंकू महाराजांच्या व्यक्तिरेखेला अनेक पळू आहेत पदर आहेत."

पुढे स्वानंद बर्वे म्हणाला," महत्त्वाचे म्हणजे वारकरी कीर्तन वा अभंग किंवा एकंदरीतच वारकरी सांप्रदाय याच्याशी खूप जवळून संबंध ही भूमिका साकारताना आला. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लहानग्या इंदूसोबत काम करताना आणि एका वेगळ्याच भाषेच्या लहेजामध्ये काम करताना खरंच खूप मजा आली. मालिकेचे ३०० भाग कधी पूर्ण झाले हे कळलेच नाही. मालिकेतल्या सगळ्या लहान मुलांसोबत काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि खान सांगायचं तर मजा आली. हे पत्र साकारणं माझ्यासाठी आनंदाचा आणि खूप काही शिकवून जाणारा भाग होता. संपूर्ण टीमने केलेल्या उत्तम सहकार्यामुळे व्यंकू महाराज हे पात्र उभं करता आलं. प्रेक्षकांना हे पात्र आणि मालिका आवडते आहे त्याची पावती मिळते आहे हीदेखील माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे."

Indrayani Update
Neha Dhupia: नेहा धुपिया अचानक सेटवर बेशुद्ध, वाचा पुढे काय झालं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com